उद्या(18 डिसेंबर) जयपूरमध्ये आयपीएलच्या 12 व्या मोसमाचा लिलाव रंगणार आहे. या मोसमासाठी आठही संघांनी संघबांधणीची तयारी केली आहे. प्रत्येक संघानी 15 नोव्हेंबरला संघातून मुक्त केलेल्या आणि संघात कायम ठवलेल्या खेळाडूंची यादी आधीच जाहीर केली आहे.
त्यानुसार आता प्रत्येक संघाकडे भारतीय आणि परदेशी खेळाडू संघात सामील करुन घेण्यासाठी काही जागा शिल्लक आहेत.
या आयपीएल लिलावासाठी 1003 खेळाडूंनी नोंदणी केली होती. त्यातील 346 खेळाडूंचीच अंतिम निवड करण्यात आली आहे. यात 226 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. या 346 खेळाडूंचा 70 जागांसाठी लिलाव होणार आहे.
आयपीएलमध्ये प्रत्येक संघ कमीतकमी 18 तर जास्तीत जास्त 25 खेळाडू संघात घेऊ शकतात. त्यामध्येही प्रत्येक संघ फक्त 8 परदेशी खेळाडू संघात घेऊ शकतात.
यानुसार प्रत्येक संघाकडे भारतीय आणि परदेशी खेळाडूंसाठी अशा जागा आहेत शिल्लक-
1. चेन्नई सुपर किंग्ज – गतविजेते चेन्नई सुपर किंग्जने 2018 च्या संघातून फक्त तीन खेळाडूंना मुक्त करण्यात आलेले आहे. यामध्ये कनिष्क शेथ, क्षितिज शर्मा हे भारतीय खेळाडू तर मार्क वूड या परदेशी खेळाडूला मुक्त केले आहे.
तसेच चेन्नईने कायम केलेल्या खेळाडूंमध्ये आधीच 8 परदेशी खेळाडू आहेत. त्यामुळे आता त्यांच्या संघात 2019 च्या आयपीएलसाठी एकाही परदेशी खेळाडूंची जागा शिल्लक नाही. तर त्यांचा कायम केलेला संघ 23 जणांचा असल्याने त्यांच्याकडे अजून 2 भारतीय खेळाडूंसाठी जागा शिल्लक आहे.
शिल्लक असलेल्या जागा 2 – परदेशी खेळाडू – 0, भारतीय – 2
सध्या संघात असणारे खेळाडू –
भारतीय – एमएस धोनी, रविंद्र जडेजा, सुरेश रैना, केदार जाधव, कर्ण शर्मा, शार्दुल ठाकूर, अंबाती रायडू, मुरली विजय, हरभजन सिंग, दीपक चहर, केएम असिफ, एन जगदिसन, मोनु सिंग, ध्रुव शोरे, चैतन्य बिश्नोई,
परदेशी खेळाडू – ड्वेन ब्रावो, शेन वॉटसन, फाफ डुप्लेसिस, सॅम बिलिंग्स, इम्रान ताहीर, डेविड विली, मिशेल सॅन्टेनर, लुंगीसानी एन्गिडी,
2. मुंबई इंडियन्स – तीन वेळचे आयपीएल विजेते मुंबई इंडियन्सच्या संघात 2019 च्या आयपीएलमध्ये काही महत्त्वाचे बदल दिसून येणार आहेत. कारण त्यांनी 10 खेळाडूंना मुक्त केले आहे.
या 10 खेळाडूंमध्ये जेपी ड्यूमिनी, पॅट कमिन्स, मुस्तफिजूर रेहमान आणि अकिला धनंजया या 4 परदेशी खेळाडूंना तर एकूण तर 6 भारतीय खेळाडूंना मुक्त केले आहे.
त्यामुळे त्यांच्या संघात सध्या एकूण 18 खेळाडू आहेत. यात 7 परदेशी खेळाडू आहेत. त्यामुळे त्यांच्या संघात 2019 च्या आयपीएलसाठी 6 भारतीय खेळाडूंची तर 1 परदेशी खेळाडूची जागा शिल्लक आहे.
शिल्लक असलेल्या जागा 7- परदेशी खेळाडू – 1, भारतीय – 6
सध्या संघात असणारे खेळाडू –
भारतीय – रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पंड्या, इशान किशन, सूर्यकुमार यादव, मयंक मार्कंड, राहुल चहर, अनुकुल रॉय, सिद्धेश लाड, आदित्य तारे.
परदेशी खेळाडू – क्विंटन डीकॉक, एव्हिन लेविस, किरॉन पोलार्ड, बेन कटिंग, मिशेल मॅक्लेनाघन, अॅडम मिलने, जेसन बेरेन्डॉन्फ.
3. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – विराट कोहली कर्णधार असलेल्या बेंगलोर संघाने मागील दोन मोसमात खराब कामगिरी केली आहे. त्यामुळे 2019 ला त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची चाहत्यांना अपेक्षा आहे.
2019 च्या आयपीएलसाठी बेंगलोर संघाने एकूण 14 खेळाडूंना कायम केले आहे तर मार्कस स्टॉयनिसचा संघात समावेश केला आहे. त्यामुळे त्यांच्या संघात आत्ता एकूण 15 खेळाडू असून यात 6 परदेशी खेळाडू आहेत.
यामुळे त्यांच्याकडे 2 परदेशी खेळाडूंसाठी आणि 8 भारतीय खेळाडूंसाठी असा एकूण 10 खेळांडूंसाठी जागा शिल्लक आहे.
त्यांनी 6 खेळाडूंना मुक्त केले असून यात ब्रेंडन मॅक्यूलम, कोरे अँडरसन आणि ख्रिस वोक्स असे 3 परदेशी खेळाडू आहेत.
शिल्लक असलेल्या जागा 10- परदेशी खेळाडू – 2, भारतीय – 8
सध्या संघात असणारे खेळाडू –
भारतीय – विराट कोहली, पार्थिव पटेल, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुन्दर, पवन नेगी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलवंत खेरोलिया.
परदेशी खेळाडू – एबी डिव्हिलियर्स, नॅथन कुल्टर-नाईल, मोईन अली, कॉलिन डी ग्रँडहोमे, टिम साऊदी, मार्कस स्टॉयनिस.
4. राजस्थान रॉसल्स – आयपीएलमध्ये मागील वर्षी प्ले आॅफमध्ये स्थान मिळवत दोन वर्षांच्या बंदीनंतर जबरदस्त पुनरागमन केलेल्या राजस्थानच्या संघाने 2019 च्या आयपीएलसाठी एकूण 10 खेळाडूंना मुक्त केले आहे.
या दहा खेळाडूंमध्ये 5 खेळाडू परदेशी तर 5 भारतीय खेळाडू आहेत. तसेच त्यांचा सध्याचा संघ 16 जणांचा आहे. यामध्ये 5 परदेशी खेळाडू आहेत.
त्यामुळे त्यांच्या संघात 2019 च्या आयपीएलसाठी 9 जागा शिल्लक असून यात 3 जागा परदेशी खेळाडूंसाठी आणि 6 जागा भारतीय खेळाडूंसाठी शिल्लक आहेत.
शिल्लक असलेल्या जागा 9- परदेशी खेळाडू – 3, भारतीय – 6
सध्या संघात असणारे खेळाडू –
भारतीय – अजिंक्य रहाणे, कृष्णप्पा गॉथम, संजू सॅमसन, श्रेयस गोपाळ, आर्यमान बिर्ला, एस मिथून, प्रशांत चोप्रा, स्टुअर्ट बिन्नी, राहुल त्रिपाठी, धवल कुलकर्णी, महिपाल लोमरोर.
परदेशी खेळाडू – बेन स्टोक्स, स्टीव्ह स्मिथ, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर, इश सोधी.
5. कोलकता नाईट रायडर्स – आयपीएलच्या 11 व्या मोसमात तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवलेल्या कोलकता संघाकडे 2019 च्या आयपीएलसाठी एकूण 12 जागा शिल्लक आहेत. यात 5 परदेशी तर 7 भारतीय खेळाडूंसाठी या जागा शिल्लक आहेत.
कोलकता संघाने आयपीएलच्या 12 व्या मोसमासाठी फक्त 13 खेळाडूंना कायम केले असून यात सुनील नरेन, आंद्रे रसल आणि ख्रिस लिन या तीन परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
तसेच त्यांनी 8 खेळाडूंना मुक्त केले आहे. यामध्ये मिशेल स्टार्क, मिशेल जॉन्सन, टॉम करन, कॅमरुन डेलपोर्ट आणि जवॉन सिर्ल्स या 5 परदेशी आणि इशान जग्गी, अपूर्व वानखेडे आणि विनय कुमार या 3 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.
शिल्लक असलेल्या जागा – 12- परदेशी खेळाडू – 5, भारतीय – 7
सध्या संघात असणारे खेळाडू –
भारतीय – दिनेश कार्तिक, रॉबिन उथप्पा, शुबमन गिल, पियुष चावला, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, शिवम मावी, नीतीश राणा, रिंकू सिंग, कमलेश नागकोटी
परदेशी खेळाडू – सुनील नारायण, आंद्रे रसल आणि ख्रिस लिन
6. दिल्ली कॅपिटल्स – 2018 च्या आयपीएलमध्ये शेवटच्या स्थानावर असलेल्या दिल्लीने यावर्षी गौतम गंभीर, जेसन रॉय, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद शमी अशा मोठ्या खेळाडूंना मुक्त केले आहे.
त्यांनी एकूण 10 खेळाडूंना आयपीएल 2019 साठी मुक्त केले आहे. तसेच 14 खेळाडूंना संघात कायम ठेवले असून सनरायझर्स हैद्राबादकडून शिखर धवनला आपल्या संघात सामील करुन घेतले आहे.
त्यामुळे दिल्लीकडे 10 खेळाडूंसाठी जागा शिल्लक असून यात 3 परदेशी खेळाडूंसाठी तर 7 भारतीय खेळाडूंसाठी जागा शिल्लक आहेत. तसेच आयपीएल 2019च्या लिलावासाठी एकूण 25.50 कोटी रुपये शिल्लक आहेत.
शिल्लक असलेल्या जागा – 10- परदेशी खेळाडू – 3, भारतीय – 7
सध्या संघात असणारे खेळाडू –
भारतीय – श्रेयस अय्यर, रिषभ पंत, पृथ्वी शॉ, अमित मिश्रा, आवेश खान, हर्षल पटेल, राहुल तेवतिया, जयंत यादव, मनजोत कालरा.
परदेशी खेळाडू – कॉलिन मुनरो, ख्रिस मॉरिस, कागिसो रबाडा, संदीप लामिच्छाने, ट्रेंट बोल्ट.
7. किंग्ज इलेव्हन पंजाब – 2019 च्या आयपीएलसाठी पंजाब संघाने सर्वाधिक 11 खेळाडूंना मुक्त केले आहे. मुक्त केलेल्या खेळाडूंमध्ये युवराज सिंग, एॅरॉन फिंच, अक्षर पटेल, मनोज तिवारी अशी मोठे नावे आहेत.
त्याच्यासाठी 2018 चा आयपीएल मोसम खास ठरला नव्हता. त्यांनी गुणतालिकेत सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.
त्यांनी 2019 च्या आयपीएलसाठी फक्त 9 खेळाडूंना कायम केले आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या मंदिप सिंगला आपल्या संघात सामिल करुन घेतले आहे. त्यामुळे सध्याच्या पंजाब संघात एकूण 6 भारतीय खेळाडू आणि 4 परदेशी खेळाडू आहेत.
शिल्लक असलेल्या जागा – 15- परदेशी खेळाडू – 4, भारतीय – 11
सध्या संघात असणारे खेळाडू –
भारतीय – आर अश्विन, केएल राहुल, मयांक अगरवाल, अंकित राजपूत, करुण नायर, मंदिप सिंग,
परदेशी खेळाडू – ख्रिस गेल, अँड्र्यू टाय, मुजीब उर रेहमान, करुण नायर, डेविड मिलर
8. सनरायझर्स हैद्राबाद – आयपीएल 2018चे उपविजेत्या हैद्राबादला शिखर धवनने संघाची साथ सोडल्याने सुरुवातीलाच मोठा धक्का बसला होता. धवनवा दिल्लीने संघात घेतले आहे.
हैद्राबादने 2019 च्या आयपीएलसाठी एकूण 17 खेळाडूंना कायम केले आहे. तसेच त्यांनी विजय शंकर, शहाबाज नदीम आणि अभिषेक शर्मा या तीन खेळाडूंना संघात सामील करुन घेतले आहे. सध्या 20 खेळाडू असलेल्या हैद्राबादच्या संघात 6 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
शिल्लक असलेल्या जागा – 5- परदेशी खेळाडू – 2, भारतीय – 3
सध्या संघात असणारे खेळाडू –
भारतीय – बासिल थंपी, भुवनेश्वर कुमार, दीपक हुडा, मनीष पांडे, टी नटराजन, रिकी भुई, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल, श्रीवत्स गोस्वामी, खलील अहमद, युसुफ पठाण.
परदेशी खेळाडू – डेव्हिड वॉर्नर, केन विल्यम्सन, बिली स्टॅनलेक, रशीद खान, मोहम्मद नबी , शाकिब अल हसन.
आयपीएल 2019 च्या लिलावासाठी कोणत्या संघाकडे किती रक्कम आहे शिल्लक-
9.70 कोटी- हैद्राबाद सनरायझर्स
08.40 कोटी- चेन्नई सुपर किंग्ज
11.15 कोटी- मुंबई इंडियन्स
15.20 कोटी- कोलकाता नाइट रायडर्स
18.15 कोटी- रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
20.95 कोटी- राजस्थान रॉयल्स
25.50 कोटी- दिल्ली कॅपिटल्स
36.20 कोटी- किंग्ज इलेव्हन पंजाब
महत्त्वाच्या बातम्या:
–उद्या होणाऱ्या आयपीएल 2019 लिलावाबद्दल सर्वकाही…
–पृथ्वी शॉच्या ऐवजी टीम इंडियात निवड झालेला कोण आहे मयंक अगरवाल?
–बॉक्सिंग डे कसोटीसाठी या दोन प्रतिभावान खेळाडूंचा टीम इंडियात समावेश?
–मोठी बातमी: भारताला मोठा धक्का, पृथ्वी शॉ कसोटी मालिकेला मुकणार