---Advertisement---

२०२० आयपीएल युएईमध्ये झाली, तर दिल्ली कॅपिटलचे हे ४ खेळाडू करु शकतात दमदार कामगिरी

On: रविवार, जुलै 26, 2020 5:23 PM
---Advertisement---

क्रिकेट जगातील सर्वात मोठी टी२० क्रिकेट स्पर्धा इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या सत्राचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आयपीएलचा हंगाम यंदा जवळपास नक्की झाला आहे. यावर्षी ऑस्ट्रेलियात होणारी टी२० विश्वचषक स्पर्धा आयसीसीने रद्द केल्यानंतर आयपीएल स्पर्धेचा मार्ग मोकळा झाला आहे.

यंदाचा आयपीएल हंगाम दि. १९ सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याचे सांगितले जात असून, या स्पर्धेचे आयोजन युएईमध्ये होण्याची दाट शक्यता आहे, या दरम्यान सर्व संघांनीही तयारी दर्शविली आहे.

यंदाच्या आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघ विजेतेपदाचे लक्ष घेऊन मैदानात उतरेल. दिल्ली कॅपिटलच्या संघात प्रतिभेची कमतरता नाही. या संघातील चांगली कामगिरी करु शकणाऱ्या ४ खेळाडूंचा या लेखात आढावा घेतला आहे.

दिल्ली कॅपिटलचे हे ४ खेळाडू यंदा उत्कृष्ट प्रदर्शन करू शकतात….

१. रिषभ पंत (Rishabh Pant)

भारतीय क्रिकेट संघाचा युवा प्रतिभावान यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा प्रमुख सदस्य आहे. रिषभ पंत आयपीएल कारकीर्दीत आतापर्यंत दिल्ली कॅपिटल संघातूनच खेळत आहे, संघासाठी त्याने आतापर्यंत अतिशय प्रभावी कामगिरी बजावली आहे.

पंतने त्याच्या कामगिरीने या संघात आपला एक वेगळा ठसा उमटविला आहे. सातत्याने चांगली कामगिरी करणारा रिषभ पंत या मोसमासाठी सज्ज असल्याचे दिसून आले आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत ५४ सामन्यात १६२.६९ च्या स्ट्राईक रेटने १७३६ धावा केल्या आहेत. त्याने एक शतक आणि ११ अर्धशतके झळकावली आहेत. आयपीएलमधील त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद १२८ आहे. 

२. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw)

पृथ्वी शॉ हा भारतीय क्रिकेट संघातील युवा खेळाडूंमधील एक प्रतिभावान खेळाडू आहे. गेल्या काही वर्षात पृथ्वी शॉने त्याच्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. पृथ्वी शॉला २०१८ मध्ये आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्यावेळी तो दिल्ली कॅपिटलच्या संघात सामील झाला होता.

पृथ्वीने त्याच्या आयपीएल हंगामात चमकदार कामगिरी केली. परंतु २०१९ मध्ये त्याची आयपीएलमधील कामगिरी चांगली झाली नाही, परंतु या फलंदाजाच्या क्षमतेकडे पाहिले तर तो येत्या मोसमात कामगिरी करु शकतो. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये २५ सामन्यात ५९८ धावा केल्या आहेत. त्यात त्याने २ अर्धशतकी खेळी साकारल्या आहेत.

३. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer)

मुंबईचा युवा फलंदाज श्रेयस अय्यरने भारतीय क्रिकेटच्या मर्यादित षटकांच्या संघात आपले स्थान स्थापित केले आहे. श्रेयस अय्यरने गेल्या काही वर्षात चांगली कामगिरी केली आहे. आयपीएलमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे. सध्या तो आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल संघाचा कर्णधार आहे.

कर्णधार आणि फलंदाज म्हणून त्याची कामगिरी उल्लेखनीय झाली आहे. यावेळी देखील त्याची फलंदाजीही या मोसमात उत्तम होईल अशी सर्वांना अपेक्षा आहे. श्रेयसने आतापर्यंत आयपीएलमध्ये ६२ सामन्यात १६८१ धावा केल्या आहेत. त्यात त्याने १३ अर्धशतके केली आहेत.

४. कगिसो रबाडा (Kagiso Rabada)

आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. रबाडा हा चांगला वेगवान गोलंदाज आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी केल्यामुळे, त्याला आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटलच्या संघात संधी मिळाली. आयपीएलमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

२०१८ च्या हंगामात कगिसो रबाडाने गोलंदाजीत आपले वर्चस्व राखले, मात्र २०१९ मध्ये तो फार काही करू शकला नाही, त्यावेळी तो दुखापतीशीही सामना करत होता. परंतु यावेळी रबाडा त्याच्या गोलंदाजीने फलंदाजांना अडचणीत आणू शकतो. त्याने दिल्लीकडून खेळलेल्या १८ सामन्यांमध्ये ३१ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

२०० वर्षांपूर्वी पहिले द्विशतक ठोकणाऱ्या क्रिकेटरने साकारल्यात या भूमिका; ईस्ट इंडिया कंपनीची…

स्टुअर्ट बिन्नीने ‘तो’ मोठा विक्रम मोडल्यानंतर अनिल कुंबळेनी पाठवला होता ‘हा’ खास संदेश

‘घराणेशाही’च्या आरोपामुळे त्रस्त होता हा पाकिस्तानचा खेळाडू;  बाथरूममध्ये रडायचा तासंतास

ट्रेंडिंग लेख-

काय सांगता! या ३ वेळेला संपूर्ण संघाला मिळूनही करता आल्या नाहीत १० धावा

भारतीय संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणरे ३ दिग्गज खेळाडू…

वनडेत एका वर्षात सर्वाधिक शतके करणारे ३ दिग्गज भारतीय फलंदाज; रोहित शर्मा आहे या क्रमांकावर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---