लवकरच इंडियन प्रीमियर लीग २०२२ला (आयपीएल) विजेता संघ मिळणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम, नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता १ लाख ३२ हजार इतकी आहे. अशात या सामन्याला बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या सिताऱ्यांसह भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा हजेरी लावणार असल्याचे समजत आहे.
मोदी (Narendra Modi) आणि शहा (Amit Shah) प्रत्यक्षात सामना पाहण्यासाठी अहमदाबादच्या स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) येणार असल्याने या स्टेडियमला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मोदी आणि शहांच्या उपस्थितीमुळे सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त केला जाणार आहे.
इंडियन एक्सप्रेसशी बोलताना अहमदाबादचे पोलिस आयुक्त संजय श्रीवास्तव यांनी सुरक्षा व्यवस्थेबद्दल माहिती दिली आहे. मोदी आणि शहा येणार असल्याने अहमदाबाद शहरात ६००० सुरक्षा कर्मचारी तैणात करण्यात आले आहेत. यापैकी ५००० पोलिस हवालदार तर १००० होमगार्ड असतील. याखेरीज १७ डीसीपी, ४ डीआयजी, २८ एसीपी, २१ पोलिस निरीक्षक, २६८ उपनिरीक्षक हेदेखील या बंदोबस्तचा भाग असतील, अशी माहिती श्रीवास्तव यांनी दिली आहे.
अंतिम सामन्यापूर्वी होणार समारोप समारंभ
दरम्यान आयपीएल २०२२च्या अंतिम सामन्यापूर्वी समारोप समारंभ होणार आहे. संध्याकाळी ६:३० वाजता या हंगामाचा समारोप समारंभ (क्लोजिंग सेरेमनी) सुरू होणार आहे. यामध्ये बॉलीवूडचे अनेक सेलिब्रेटी सहभाग घेणार आहे. हा समारोप समारंभ जवळपास ४५ मिनिटे चालू शकतो. याआधी २०१८च्या आयपीएल हंगामाचा समारोप समारंभ झाला होता. २०१९मध्ये पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या सैनिकांसाठी हा समारंभ टाळला होता. तर २०१९ नंतर कोरोनामुळे तो करता आला नाही.
यंदाच्या हंगामात या समारोपासाठी ऑस्कर विजेता संगीतकार एआर रहमान (A.R.Rahman) हे आपल्या संगीताची जादू सादर करणार आहे. तर अभिनेता रणवीर सिंग चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे. या दोघांबरोबरच मोहित चौहान आणि बेनी द्याल हे पण आपली कला सादर करणार आहे.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
IPL Final 2022 I गुजरातसाठी स्वप्नवत प्रवास, तर राजस्थानने अनेक संकटे पार करत गाठलीये फायनल
आयपीएल २०२२च्या थरारक अंतिम सामन्यात ‘हा’ अभिनेता करणार कॉमेंट्री, क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला
राजस्थानच्या ‘या’ जोडीवर मात करू शकले नाही, तर गुजरातसाठी ट्रॉफी जिंकणे कठीण