कॅन्सर हा असा रोग आहे की त्यावर मात करणे म्हणजे खूप जिद्द आणि हिंमत लागते. आजतागायत कॅन्सरवर मात करण्यासाठी ठोस उपचार देखील आलेला नाही, त्यामुळे खूप प्रयत्न करून सुद्धा अनेक लोकांनी प्राण गमावले आहेत.
कोचीमध्ये स्थायिक असलेले ‘रमेश कुमार’ यांच्या पत्नीला कॅन्सर झाला होता. ते बायकोला प्रेमाने ‘अचू’ असे बोलायचे. त्यांची बायको अर्थात अचू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची प्रचंड चाहती होती. तिची मरण्याआधी एकच इच्छा होती ती म्हणजे सचिनला प्रत्यक्षात पाहण्याची. ही एक हृदयाला स्पर्श करणारी कहाणी रमेश यांनी स्वतः त्यांच्या फेसबुक प्रोफाइलवर पोस्ट केली आहे.
कॅन्सर झाल्याने त्यावर उपचार म्हणून तिची कॅमीओथेरपी ट्रीटमेंट करण्यात आली आणि तिने कॅन्सरवर यशस्वी सा लढा दिला, त्यावर तिने रमेश यांना सांगितले की, “माझं फक्त शरीर कमजोर झालंय पण मनाने आणि विचाराने मी अजूनही तितकीच मजबूत आहे. ” पुढे रमेश म्हणतात हा सेल्फी माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आठवण आहे कि जो आम्ही कोची इंटरनॅशनल स्टेडियम बाहेर काढला होता.
इंडियन सुपर लीग दरम्यान सचिनच्या मालकीची टीम असलेली ‘केरला ब्लास्टरचा’ सामना पाहण्यासाठी सचिन कोचीमध्ये येणार होता, हे त्याच्या बायकोला कळताच तिने लगेचच रमेश यांच्याकडे सचिनला भेटण्याचा प्रस्ताव टाकला. पण दुर्दैवाने तिला कॅन्सरने पुन्हा विळखा घातला, त्यामुळे तिची दुसऱ्यांदा कॅमीओथेरपी करण्यात आली, ते सुद्धा सामन्याच्या चार दिवस आधी. ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर सामन्याच्या एक दिवस अगोदर अचूने रमेशला विचारले ‘आता आपण सचिनला पाहू शकत ना ?’ कारण तिला आणि मला जाणीव होती की ही कॅन्सरची शेवटची पायरी आहे, तिला कधी मरण येऊ शकते यावर रमेशने लिहिले आहे हि तिची शेवटची असल्याने ती पूर्ण करणे मला भाग होते.
मी तिला विचारले तुझ्या अंगात जिद्द आणि ताकद असेल तर नक्की आपण सामना पाहण्यासाठी जाऊ. एका दृष्टिकोनातून हे तिच्यासाठी धोक्याचे होते पण एका क्षणाला वाटले आपण बरोबर करत आहोत त्यानंतर तिने उत्तर दिले की या जगातील प्रत्येकाच्या नशिबात कधी ना कधी मरण हे लिहिलेले असते. मी मरणाला घाबरत नाही तर आपण चाललोय ना? आणि मी एक हास्य दिले नंतर मी लगेचच कोचीमधील माझ्या मित्राच्या घरी जाऊन तिकीट काढली आणि ४ मित्रांच्या मदतीने सर्व योजना आखली. त्यांना सांगितले कि स्टेडियममध्ये आत आल्यानंतर तुम्ही माझ्या सोबत राहाल. त्याचप्रमाणे ‘इमरजन्सी एक्सिट’ कुठून आहे हे सर्व विचारून घेतले जेणेकरून मध्येच अचूला काय झाल्यास तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेता येईल.
https://www.facebook.com/photo.php?fbid=1627815473955552&set=a.502327483171029.1073741826.100001813448775&type=3
घरी आल्यानंतर अचूने विचारले “काय मग आपण चाललोय ना उद्या सामना पाहायला. मला माहितीये की नक्कीच सर्व व्यवस्था केली असणार, बरोबर ना ?” हे सांगताना सचिनला पाहण्यासाठी तिची तळमळ तिच्या डोळ्यात मला दिसत होती. ठरल्याप्रमाणे आम्ही दुसऱ्यादिवशी सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये दाखल झालो आणि सचिन दिसतात तिने माझ्या खिशातील मोबाइल काढला. फ्लॅशलाइट चालू करून ‘सचिन सचिन’ जोर जोरात आवाज देऊ लागली आणि तिच्या बरोबर मी सुद्धा काहीकाळ का होईना. आम्ही दोघं सर्व दुःख ,वेतना विसरून गेलो होतो.
पुढे त्याने त्याने लिहिले आहे की ती गेली पण या जगाला एक संदेश देऊन गेली ‘प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कोणीही काहीही करू शकतो. “आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत लढा द्या विजय तुमचाच आहे आणि आयुष्यातील प्रत्येक सेकंदाचा आनंद घ्यायला शिका ”
-उद्धव प्रभू (टीम महा स्पोर्ट्स )