गतविजेत्या हैदराबाद एफसीला हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३ ( आयएसएल ) मध्ये पुन्हा विजयपथावर परतायचे आहे. शनिवारी त्यांच्यासमोर लीगमध्ये संघर्ष करावा लागणाऱ्या चेन्नईयन एफसीचे आव्हान आहे. चेन्नईतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर ही लढत होणार आहे आणि यजमान चेन्नईयनकडून चाहत्यांना विजयाची अपेक्षा आहे. हैदराबाद एफसीची विजयी मालिका केरळा ब्लास्टर आणि एटीके मोहन बागान यांनी रोखली. दुसरीकडे चेन्नईयनला मागील सामन्यात लेट गोलमुळे ओडिशा एफसीकडून हार मानावी लागली आहे.
यजमानांनी मागील ५ पैकी २ सामने जिंकेल आहेत , तर ३ मध्ये हार मानावी लागली आहे. यंदाच्या पर्वातील घराच्या मैदानावरील कामगिरी ही चेन्नईयन साठी चिंताजनक आहे. ४ पैकी एकच सामना त्यांनी जिंकला आहे.
अल खयाती हा मागच्या सामन्यात बदली खेळाडू म्हणून मैदानावर उतरला आणि गोल केला. आता मुख्य प्रशिक्षक थॉमस ब्रडरिच त्याचा कसा वापर करुन घेतात हे पाहणे उत्सुकतेचे आहे. पण त्याला सुरुवातीपासून खेळवण्यासाठी त्यांना एका परदेशी खेळाडूला बाकावर बसवावे लागेल.
” संघातील सर्वोत्तम खेळाडूंना घेऊन मैदानावर उतरण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. सामना जिंकण्याचा आमचा निर्धार आहे आणि उद्या त्यातलीच एक संधी आहे. नासेर उद्याच्या सामन्यासाठी तयार आहे आणि तो ऑप्शनमध्ये आहे. लीगच्या पहिल्या दिवसापासून आम्ही खेळाडू सर्वोत्तम फ़ॉर्मात असावेत यासाठी प्रयत्नशील आहोत. आमच्याकडे बरेच पर्याय आहेत,” असे ब्रडरिच म्हणाले.
हैदराबाद एफसीने ४० दिवस तालिकेतीलनंबर वन स्थान टिकवले होते, परंतु त्यांना सलग दोन पराभव पत्करावे लागले. त्यांनी केवळ टॉप स्थान गमावले नाही, तर या दोन्ही सामन्यांत त्यांना गोल करता आले नाही. हिरो आयएसएलमध्ये गटविजेत्यांना सलग तीन सामन्यांत गोल करता न आल्याची नामुष्की त्यांना टाळायची आहे.
लक्ष्मीकांत कट्टीमणी याची उणीव संघाला प्रकर्षाने जाणवतेय. “चेन्नईयनच्या संघाचा आक्रमक चांगला आहे. या संघाचा अंदाज बांधणे अवघड आहे आणि याची प्रचिती ओडिशाविरुद्धच्या सामन्यात आली,” असे हैदराबादचे प्रशिक्षक मार्क्युज म्हणाले.
उभय संघ ६ वेळा एकमेकांविरुद्ध खेळले आहेत आणि त्यात चेन्नईयनने ३ , तर हैदराबादने २ विजय मिळवले आहेत. चेन्नईयन १० गुणांसह तालिकेत सातव्या क्रमांकावर आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एटीके मोहन बागानची अपराजित मालिका कायम; बंगळुरू एफसीला घरच्या मैदानावर अपयश
भारताची चौकडी तंबूत, बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या वनडेतच भारत करतोय संघर्ष