---Advertisement---

आनंदाची बातमी! केरला ब्लास्टर्सला नमवत हैदराबादचा दणक्यात विजय; आयएसएल विजेतेपदावर कोरले नाव

On: रविवार, मार्च 20, 2022 11:56 PM
Hyderabad-FC
---Advertisement---

इंडियन सुपर लीग २०२१-२२ हंगामाचा अंतिम सामना रविवारी (२० मार्च) पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडिअम फातोर्दा येथे हैदराबाद एफसी विरुद्ध केरला ब्लास्टर्स संघात पार पडला. या सामन्यात दोन्ही संघांनी १-१ गोल करत बरोबरी साधली होती. मात्र, हैदराबाद संघाने ३-१ पेनल्टीच्या जोरावर केरलाला पराभूत केले.

होलिचरण नर्झारीने विजयी पेनल्टीवर गोल केल्याने केरलाला अंतिम फेरीत तिसऱ्यांदा पराभव पत्करावा लागला. या सामन्यात २०१४ आणि २०१६ सालची पुनरावृत्ती झाली. केरलाने या हंगामातही अंतिम सामन्यात पराभवाचे तोंड पाहिलं.

केरला ब्लास्टर्सने (Kerala Blasters FC) सामन्यात जोरदार सुरुवात केली आणि ३९ व्या मिनिटाला अल्वारो वाझक्वेझचा बॉक्सच्या काठावरून मारलेला शॉट गोलपोस्टच्या बाहेर आदळला. केरलाने सामन्यात एकदा नव्हे, तर तीनदा गोलसाठी प्रयत्न केले.

केरलाच्या पहिल्या हाफच्या प्रभावी प्रदर्शनानंतर, त्यांचा स्थानिक खेळाडू राहुल केपीने ६८व्या मिनिटाला पहिला गोल केला. त्रिशूरमध्ये जन्मलेल्या या खेळाडूने बॉक्सच्या बाहेरून एक भन्नाट स्ट्राईक मारला, जो हैदराबादचा गोलकीपर लक्ष्मीकांत कट्टीमणीने स्पर्श करूनही नेटमध्ये घुसला. मात्र, पुढील २० मिनिटांनी हेच दिसून आले. हैदराबाद एफसीने (Hyderabad FC) निर्धारित वेळेसाठी फक्त दोन मिनिटे शिल्लक असताना बरोबरी साधली.

गोव्यात जन्मलेल्या साहिल तावोराने लीगच्या इतिहासात फक्त दोन गोल केले होते. त्याने बॉक्सच्या बाहेरून उजव्या पायाने घरच्या भूमीवर हंगामातील पहिला गोल केला आणि पराभवाच्या दरीतून अंगाला बाहेर काढले. केरलाचा गोलकीपर प्रभसुखन गिल हा गोल पोस्टमधील एक खंबीर आधारस्तंभ होता. परंतु सामना अतिरिक्त वेळेत गेल्याने तो तवोरासमोर कमजोर दिसला.

महत्त्वाच्या बातम्या-

सामना पाहाताना गॅलरी कोसळली अन् शेकडो माणसे चेंगरली, अंगाचा थरकाप उडवणारा Video व्हायरल

हैदराबाद-केरला ब्लास्टर्समध्ये आज फायनल; आयएसएलला मिळणार नवा विजेता

हैदराबाद एफसीची ऐतिहासिक कामगिरी, प्रथमच मारली फायनलमध्ये धडक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---