गेल्या आठवड्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलिया विरुद्ध केलेल्या विश्वविक्रमी ४८२ धावसंख्येनंतर क्रिकेट विश्वावातून गोलंदाजांच्या बचावासाठी सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीसह अनेक दिग्गज मैदानात उतरले होते.
या यादीत आता ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज गोलंदाज ब्रेट ली सामील झाला आहे.
“मला पुन्हा एकदा एकदिवसीय क्रिकेटमध्ये २५०-२८० धावांचे सामने आव्हानात्मक होताना पहायचे आहेत. त्यासाठी आजच्या काळातील फलंदाजांसाठी उपयुक्त असलेल्या खेळपट्यांमध्ये पहिल्यांदा थोडेसे बदल करणे आवश्यक आहे.” असे ब्रेट लीने गोलंदाजांची बाजू घेत सांगितले.
“गोलंदाजांचा विचार करून गोलंदाजांना मदत मिळतील अश्या खेळपट्यां तयार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मला अजूनही असे वाटते की २५०-२८० ही धावसंख्या आव्हानात्मक ठरू शकते.” असे ब्रटली पुढे म्हणाला.
ब्रेट लीने पुढे एकदिवसीय क्रिकेटमध्ये वापरण्यात येणाऱ्या दोन नवीन चेंडूवरही भाष्य केले.
“एकदिवसीय क्रिकेटमध्ये २५ षटके जूना चेंडूही स्विंग होऊ शकतो मात्र गोलंदाजांना फायदा होइल अशाप्रकारे स्विंग होऊ शकत नाही. एकदिवसीय सामन्यात एक चेंडू असो किंवा दोन खेळपट्टी मात्र थोडीशी गोलंदाजांना मदत करेल अशी असावी.” असे मत ऑस्ट्रेलियाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक असलेला ब्रेट ली म्हणाला.
भारताबद्दल काय म्हणाला ब्रेट ली-
” मी ज्या ज्या वेळी भारतात येतो त्यावेळी मी या सुंदर देशाचा भाग आहे असे मला वाटते. या देशातील जनतेने मला मनापासून स्विकारले आहे. त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.” ब्रेट ली त्याच्या भारताबद्दलच्या भावना व्यक्त करताना म्हणाला.
ब्रेट लीने ऑस्ट्रेलियाकडून खेळताना ७६ कसोटी सामन्यात ३१० बळी तर २२१ एकदिवसीय सामन्यात ३८० बळी मिळवले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-क्रिकेटमधील भागीदारीच नाव घ्याल तर रोहित शर्मा-शिखर धवन जोडीला तोड नाही
-१२ महिन्यात एकही वनडेत संधी न मिळालेला भारतीय गोलंदाज विश्वचषकासाठी आशावादी






