ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू जेम्स फॉकनरने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तो समलैंगिक नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच त्याने यात म्हटले आहे की त्याच्या मागील पोस्टवरुन गैरसमज झाले आहेत.
फॉकनरने सोमवारी त्याच्या वाढदिवसानिमित्त इंस्टाग्रामवर आई आणि मित्राबरोबरील फोटो शेअर केला होता. या फोटोला त्याने कॅप्शन देताना त्याने त्याच्या मित्राचा उल्लेख बॉयफ्रेंड असा केला होता. परंतू त्याच्या या कॅप्शनमुळे तो समलैंगिक असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात रंगल्या.
https://www.instagram.com/p/Bw1epixh7hN/
अखेर त्याने हे कॅप्शन एडिट करुन बॉयफ्रेंडच्या पुढे कंसात चांगला मित्र असे म्हटले आहे. तसेच त्याने नंतर दुसरी पोस्ट करत म्हटले आहे की ‘माझ्या मागील पोस्टमुळे काही गैरसमज झाले आहेत. मी समलैंगिक नाही.’
‘LBGT समुदायाला तूम्ही दिलेल्या पाठिंब्याबद्दल चांगले वाटले. पण विसरु नका की प्रेम हे प्रेम असते. तरीही @robjubbsta हा माझा चांगला मित्र आहे. आम्ही 5 वर्षापासून एका घरात राहत आहोत. त्याचे सेलिब्रेशन करत होतो. तसेच सर्वांनी दिलेल्या पाठींब्याबद्दल चांगले वाटले.’
https://www.instagram.com/p/Bw2-aefB63J/
फॉकनर हा 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून शेवटचे खेळला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाकडून 69 वनडे सामने खेळले असून 1032 धावा केल्या आणि 96 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने 24 टी20 सामने खेळताना 159 धावा केल्या आणि 36 विकेट्स घेतल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाने मिळवलेल्या 2015 च्या विश्वचषक विजयात फॉकनरने अंतिम सामन्यात चांगली कामगिरी केली होती. त्याने 9 षटकात गोलंदाजी करताना 36 धावा देत 3 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे त्याला अंतिम सामन्यात सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
–डेव्हिड वॉर्नरचा आयपीएल २०१९ला भावनिक अलविदा…
–आयपीएल २०१९: रिषभ पंतने संगकाराला मागे टाकत केला मोठा कारनामा
–इंग्लंडला मोठा धक्का, विश्वचषकातून हा खेळाडू झाला बाहेर