---Advertisement---

“द्रविड कुटुंबाचा भाग असल्याचा अभिमान”, म्हणत मराठी अभिनेत्रीच्या ‘द वॉल’ला वाढदिवसाच्या शुभेच्छा

On: गुरूवार, जानेवारी 13, 2022 6:04 PM
Aditi Dravid and Rahul Dravid
---Advertisement---

नुकताच ११ जानेवारी रोजी भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि खेळातील दिग्गज खेळाडूंपैकी एक राहुल द्रविड याचा ४९ वा वाढदिवस  झाला. त्यांना त्यांच्या चाहत्यांनी आणि कुटुंबातील सदस्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यातही मराठी अभिनेत्री अदिती द्रविडने दिलेल्या शुभेच्छांनी सर्वांचेच लक्ष वेधले.

राहुल द्रविडला कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सुंदरा मनामध्ये भरली’ यामध्ये नंदिनीची भुमिका साकारणारी अभिनेत्री अदिती विनायक द्रविडने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक जुना फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून समजते की हा काही वर्षांपूर्वीचा फोटो असून त्यावेळी राहुल द्रविड भारतीय संघाकडून खेळाडू म्हणून खेळत असावा. तसेच अदितीही छोटी मुलगी असल्याचे दिसत आहे.

तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा राहुल द्रविड. मला खुप अभिमान आहे की, आपण एकाच कुटुंबातील आहे. मला माझे अडनाव खुप आवडत असल्यामुळे मी ते कधीच बदलणार नाही. आयुष्यभरासाठी प्रेम आणि सन्मान.”

अदितीची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. तिच्या या पोस्टला आठ हजारांहुन अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. अदिती ही राहुलची पुतणी आहे.

https://www.instagram.com/p/CYk3pq1JjWK/

राहुल द्रविडला समित आणि अन्वय अशी दोन मुले आहेत. सध्या भारतीय संघाचा प्रशिक्षक असलेला राहुल द्रविड दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. तिथे भारतीय संघ तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळत असून त्यानंतर एकदिवसीय मालिका होणार आहे. ​या दौऱ्यादरम्यानच भारतीय संघाच्या खेळाडूंनी राहुल द्रविडचा ४९ वा वाढदिवस साजरा केला.

व्हिडिओ पाहा – वादापासून आयुष्यभर चार हात लांब राहिलेला Rahul Dravid जेव्हा क्रिकेटप्रेमींच्या डोक्यात गेला होता

आदिती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अदिती अभिनयासोबतच गीतकारसुद्धा आहे. सर्वप्रथम ती ‘झिलमिल’ या अल्बमधून प्रेक्षकांना दिसली होती. स्टार प्रवाहवरील ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर -महामानवाची गौरवगाथा’ या मालिकेतून तिने आंबेडकरांच्या मोठ्या बहीणीची भूमिका साकारली होती. आदितीने ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेच्या अगोदर झी मराठीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत शनायाची मैत्रिण ईशाची भूमिका साकारली होती.

महत्त्वाच्या बातम्या – 

आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषकाच्या वेळापत्रकात झाला बदल, जाणून घ्या कारण

केपटाऊन कसोटीतही रहाणेचा फ्लॉप शो सुरूच! रबाडाच्या चेंडूवर असा झाला बाद, पाहा व्हिडिओ

सिडनीचा ‘सुपरहिरो’ ख्वाजाच्या खांद्यावर पाचव्या कसोटीसाठी नवी जबाबदारी

वादापासून आयुष्यभर चार हात लांब राहिलेला Rahul Dravid जेव्हा क्रिकेटप्रेमींच्या डोक्यात गेला होता

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---