प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात चढउतार येतच असतात. त्यातून काही खेळाडू उभारी घेतात तर काही मागे पडतात. काहींना संधी मिळते तर काहींना मिळत नाही. असाच काहीसा प्रसंग भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागच्या आयुष्यात घडला होता. त्याने अलीकडेच माजी कर्णधार अनिल कुंबळेला राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्यासाठी कशी मदत केली हे सांगितले आहे.
मात्र, त्यावेळी सेहवाग खराब फॉर्ममधून जात होता. सेहवागने त्याच्या फेसबुक पेजवर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये २००७-०८ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघात त्याची निवड कशी झाली, याचा उल्लेख केला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्येही सेहवागचा फॉर्म चांगला नव्हता. अनिल कुंबळेने या महत्त्वाच्या मालिकेत आपले नाव कसे पुढे नेले, हे त्याने सविस्तर सांगितले आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याची कशी निवड झाली? याबाबत वीरेंद्र सेहवागने सांगितले आहे. त्या दौऱ्यात त्याच्या जागी आकाश चोप्रा किंवा गौतम गंभीरची निवड होणे योग्य होते, असे सेहवाग म्हणाला. देशांतर्गत क्रिकेटमधील या खेळाडूंच्या फॉर्ममुळे त्यांची निवड व्हायला हवी होती. मात्र, कुंबळेची योजना वेगळी होती. ऑस्ट्रेलियासमोर त्यांच्या घरच्या मैदानावर आक्रमक क्रिकेट खेळू शकेल असा वरच्या फळीमध्ये एखादा फलंदाज असावा, असे त्यांचे मत होते.
सेहवाग म्हणाला, ‘जेव्हा मी अनिल कुंबळेसोबत ऑस्ट्रेलियाला जात होतो, तेव्हा मी त्याला विचारले की, तू माझी निवड का केलीस? तुमच्याकडे इतर पर्याय होते. तो म्हणाला, वसीम जाफर, दिनेश कार्तिक, आकाश चोप्रा आणि राहुल द्रविड हे सर्व एकाच श्रेणीतील आहेत. हे सर्व खेळाडू २०० चेंडू खेळून शतक पूर्ण करतील. पण मला असा सलामीवीर हवा आहे, जो ऑस्ट्रेलियात जाऊन त्यांना उत्तर देऊ शकेल. त्याच्यासारखे खेळू शकेल.’
सेहवाग म्हणाला की, तो धावा काढण्यासाठी धडपडत होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही त्याने धावा केल्या नव्हत्या. अनिल कुंबळेकडून संघ निवडीचा संदेश आला तेव्हा तो खरोखरच खराब फॉर्ममध्ये होता. त्याने सांगितले की, त्यावर्षी देशांतर्गत हंगामातील सहा सामन्यांत त्याने केवळ ३६ धावा केल्या होत्या.
या ४३ वर्षीय माजी खेळाडूने सांगितले की, ‘मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये मी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवू शकला नाही. मात्र, मी अनिल कुंबळेच्या मागे लागून राहिलो. मला वाटले की माझा वाईट काळ संपणार आहे. अनिलने मला एकच गोष्ट सांगितली. आता तू खूप वाट बघितली आहे म्हणून अजून थोडा धीर धर. दोन सामन्यांनंतर मला खेळण्याची संधी मिळाली. मी पर्थमध्ये खेळलो आणि चांगली सुरुवात केली. मी जास्त धावा करू शकलो नाही, फक्त २०-३० धावा केल्या आणि दोन गडी बाद केले. आम्ही सामना जिंकला. पण माझ्यासाठी ही एक चांगली सुरुवात झाली होती.’
कुंबळेचा निर्णय योग्य ठरला, जेव्हा ऍडलेड कसोटीत सेहवागने पहिल्या डावात अर्धशतक झळकावले आणि त्यानंतर पुढच्या डावात शतक झळकावून सामना वाचवला आणि भारताला मालिका बरोबरीत आणण्यात मदत झाली.
महत्त्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडशी भिडण्यासाठी अफगाणिस्तानच्या पाठीशी उभा राहिला भारत, अश्विनने दिली मदतीची ‘ऑफर’
इतका राग…! झेल सुटला म्हणून गोलंदाजाची आपल्याच सहकाऱ्याला भर मैदानात शिवीगाळ, पाहा व्हिडिओ