‘द वॉल’ नावाने प्रसिद्ध भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने क्रिकेटक्षेत्रात आपल्या फलंदाजीने नवी ओळख निर्माण केली होती. द्रविडला वाटते की, तो आपल्या वेळेला ज्याप्रकारे फलंदाजी करत होता. त्याप्रकारे जर त्याने आता फलंदाजी केली असती, तर त्याला भारतीय संघात स्थानच मिळाले नसते.
परंतु, आपल्या हळूवार फलंदाजीव्यतिरिक्त आपल्यात असणाऱ्या बचावात्मक शैलीमुळे तो कसोटीतील विशेष फलंदाज बनू शकला असता. कारण, कसोटी सामन्यांमध्ये खेळपट्टीवर टिकून राहणे जास्त महत्त्वाचे असते. पण, वनडे सामन्यांमध्ये तेव्हाही आक्रमक फलंदाजी करणे अनिवार्य होते आणि आताही आहे. त्यामुळे द्रविडची विराट कोहली आणि रोहित शर्माबरोबर तुलना करणे चुकिचे ठरेल. द्रविडने असे म्हणण्याचे कारण हे आहे की, तो विराट आणि रोहितसारखी फलंदाजी करुच शकणार नाही. I Can’t Compare Myself With Virat Kohli And Rohit Sharma Says Rahul Dravid
द्रविडने संजय मांजरेकरसोबत बोलताना या गोष्टींचा उल्लेख केला आणि सांगितले की त्याला पुर्वीपासूनच एक कसोटी क्रिकेटपटू बनायचे होते. द्रविड म्हणाला की, “जर कसोटी क्रिकेटचा अर्थ खेळपट्टीवर टिकून राहणे, गोलंदाजांना थकवणे किंवा कठीण परिस्थितीत नवीन चेंडूची चमक संपवणे. जेणेकरुन पुढे खेळायला येणाऱ्या फलंदाजांना खेळणे सोपे होईल, हा असेल तर मी नक्कीच ते करत होतो.”
“मी ही माझी भूमिका असल्याप्रमाणे समजत होतो आणि मला या गोष्टीचा गर्व आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की, मला विरेंद्र सेहवागसारखे मोठे शॉट्स मारायचे नव्हते. उलट माझ्यातील कौशल्य वेगळे असू शकतात. मी वचनबद्ध आणि एकाग्र होतो आणि मी त्याच्यावरच काम केले होते.”
द्रविड पुढे बोलताना म्हणाला की, “निश्चितपणे मी पुर्वी जशी फलंदाजी करत होतो. तशी आता केली असती तर भारतीय संघात टिकून राहू शकलो नसतो. आजचा स्ट्राईक रेट पहा. आणि माझा वनडेतील स्ट्राईक रेट पहा. माझा स्ट्राईक रेट सचिन तेंडुलकर किंवा सेहवागसारखा नव्हता. मी माझी तुलना विराट किंवा रोहितसोबत करु शकत नाही. कारण त्यांनी वनडे क्रिकेटला नव्या उंचीवर पोहोचवले आहे. पण ईमानदारीने सांगतो, मी एक कसोटी क्रिकेटपटू बनण्याच्या उद्देशानेच पुढे वळलो होतो.”
शिवाय, द्रविडने बोलताना भारताचा मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजाराची भरपूर प्रशंसा केली. तसेच, क्रिकेटमधील रक्षात्मक शैलीचे महत्त्व सांगितले.
ट्रेंडिंग घडामोडी-
गुड न्यूज- ऑगस्ट महिन्यात टीम इंडिया जाणार या देशाच्या दौऱ्यावर?
२३ हजार धावा व १६५८ झेल घेणारा खेळाडू झालाय पेंटर, रोज करतो…
विराट- रोहितची भक्कम भागीदारी मोडण्यासाठी ‘या’ खेळाडूने मागितली होती…