भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला अनेकदा कॅप्टनकूल म्हटलं जात. त्याच्या शांत स्वभावाचे कौतुक केले जाते. पण धोनीने म्हटले आहे की तोही एक व्यक्ती असून त्यालाही भावना आहेत.
2019 च्या विश्वचषकात उपांत्य सामन्यातील न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या पराभवानंतर पहिल्यांदा समोर आलेला धोनी एका कार्यक्रमादरम्यान म्हणाला, ‘मी सर्वांसाखाच एक व्यक्ती आहे पण मी माझ्या भावना अन्य कोणाहीपेक्षा चांगल्या प्रकारे नियंत्रित करु शकतो. मी पण निराश होतो. मला पण अनेकदा राग येतो. पण महत्त्वाचे आहे की या भावना रचनात्मक नाही.’
तसेच 538 आतंरराष्ट्रीय सामने खेळलेला धोनी म्हणाला, ‘या भावनांपेक्षा आता काय करायचे आहे हे जास्त महत्त्वाचे असते. मी पुढे काय योजना आखू शकतो? मी पुढे कोणत्या खेळाडूचा उपयोग करु शकतो? हा विचार सुरु झाल्यावर मी माझ्या भावना चांगल्याप्रकारे नियंत्रित करतो.
‘कसोटीमध्ये तूमच्याकडे दोन डाव असतात. त्यामुळे तूम्हाला पुढील चालीची योजना आखण्यासाठी जरा जास्त वेळ मिळतो. पण टी20 मध्ये सर्वकाही पटापट होत असते, त्यामुळे त्याची गरज वेगळी असते.’
‘कदाचीत एखादी व्यक्ती असू शकते, ज्याने चूक केली असेल किंवा कदाचित संपूर्ण टीम असेल. कदाचीत कोणताही प्रकार असो आम्ही योग्य योजना राबवू शकलो नाही. तरी तूम्ही एक संघ म्हणून ती स्पर्धा जिंकावी असेच तूमचे ध्येय असते पण ते खूप दूरचे ध्येय असते. त्यामुळे तूम्हाला पहिल्यांदा छोट्या छोट्या गोष्टी पार करत पुढे जावे लागते.’
💬 "I am like everyone else but I control my emotions better than some of the other individuals. I also feel angry at times, disappointed. But what is important is that none of these feelings are constructive."
Dhoni opens up on being 'Captain Cool' 👇 https://t.co/EcehMwBZUq
— ICC (@ICC) October 16, 2019
धोनीने कर्णधार म्हणून कारकिर्द सुरु करताना पहिल्यांदाच 2007 चा पहिला टी20 विश्वचषक जिंकण्याचा कारनामा केला होता. या विश्वचषकाची आठवण सांगताना धोनी म्हणाला, ‘त्या विश्वचषकाबद्दल सांगायचे म्हणजे, बॉल आऊट ही खास गोष्ट होती.’
2007 च्या टी20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तान विरुद्धचा साखळी फेरीतील सामना बरोबरीत सुटल्यानंतर बॉल-आऊटचा उपयोग करण्यात आला होता. यामध्ये भारताने बाजी मारली होती.
या बॉल-आऊटबद्दल सांगताना धोनी म्हणाला, ‘मला आठवते आम्ही सरावाला गेल्यावर सरावानंतर किंवा सरावाआधी बॉल-आऊटचा सराव करायचो. त्यावेळी आम्ही मजा म्हणून करायचो. पण त्याचवेळी जो स्टंम्प सर्वाधिकवेळा हिट करेल त्यालाच तशी परिस्थिती उद्भवली तर संधी द्यायची असे ठरवले होते. मग तूम्ही गोलंदाजच असायला हवे असे नव्हते.’
‘शेवटी, जिंकणे किंवा पराभूत होणे या संघाचा भाग असलेल्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी असते. सांघित खेळात सर्वांची एक भूमिका आणि जबाबदारी असते. त्या संपूर्ण टी20 विश्वचषकात प्रत्येकाला दिलेली भूमिका आणि जबाबदारी चांगल्याप्रकारे पार पाडली गेली. त्यामुळे आम्ही तो विश्वचषक जिंकू शकलो.’