काही महिन्यांपूर्वी भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच बीसीसीआच्या सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. या निवृत्तीनंतर आता युवराजने खूलासा केला आहे की त्याला आणखी एक विश्वचषक खेळायचा होता.
2011 विश्वचषकाचा मालिकावीर युवराज आजतकशी बोलताना म्हणाला, ‘मला वाईट वाटते की 2011 नंतर मी आणखी एक विश्वचषक खेळू शकलो नाही. त्यानंतर मला संघ व्यवस्थापनाकडून आणि आजूबाजूला असणाऱ्या लोकांकडून पुरेसा पाठिंबा मिळाला नाही. जर त्यावेळी मला पाठिंबा मिळाला असता तर कदाचित मी अजून एक विश्वचषक खेळू शकलो असतो.’
‘पण मी जे काही क्रिकेट खेळले, माझ्या स्वत:च्या हिंमतीवर खेळले. मला कोणी गॉडफादर नव्हता.’
त्याचबरोबर युवराजने योयो टेस्ट उत्तीर्ण झाल्यानंतरही त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याचे म्हटले आहे.
‘मला वाटले नव्हते 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर मी खेळलेल्या 8-9 सामन्यांपैकी मला दोनदा सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतरही संघातून वगळले जाईल. मी दुखापतग्रस्त झालो होतो आणि मला श्रीलंका विरुद्धच्या मालिकेसाठी तयारी करायला सांगण्यात आले होते.’
‘अचानक मला परत जाऊन वयाच्या 36 व्या वर्षी यो-यो टेस्टसाठी तयारी करावी लागली. मी यो-यो टेस्ट उत्तीर्ण केल्यानंतरही मला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सांगण्यात आले. त्यांना वाटले मी माझ्या वयामुळे उत्तीर्ण होणार नाही आणि त्यामुळे मला नकार देणे सोपे जाईल.’
‘मला वाटते हे दुर्दैवी आहे कारण जो खेळाडू 15-16 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला असतो त्याला तूम्ही समोर बसून सांगायची गरज असते. कोणीही मला सांगितले नाही. कोणी विरेंद्र सेहवागला किंवा झहिर खानला सांगितले नाही.’
पण असे असले तरी युवराजने कोणताही पश्चाताप नसल्याचे सांगितले आहे. तसेच योग्यवेळी निवृत्ती घेतली असल्याचे म्हटले आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–सौरव गांगुली पुन्हा एकदा सांभाळणार ही महत्त्वाची जबाबदारी
–जेव्हा पुण्याचा २२ वर्षीय ऋतुराज गायकवाड एमएस धोनीला करतो इंप्रेस…
–हे आहे टीम इंडियाने विश्वचषक न जिंकण्याचे कारण, युवराज सिंगचा मोठा खूलासा