रविवारी (8 ऑक्टोबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लो स्कोरिंग, पण रोमांचक सामना पाहायला मिळाला. भारतीय संघाने हा सामना 6 विकेट्स राखून जिंकला. 97 धावांची खेळी करणाऱ्या केएल राहुल याला सामनावीर पुरस्कार दिला गेला. राहुलने सामन्याचा शेवटच षटकार मारून केलाय. पण हा षटकार मारण्याची इच्छा स्वतः राहुलचीच नव्हती.
भारतीय संघाला या सामन्यात विजयासाठी 200 धावांचे लक्ष्य मिळाले होते. भारतीय संघाला सामन्याच्या शेवटी पाच धावा हव्या होत्या आणि 53 चेंडूंचा खेळ बाकी होती. केएल राहुल त्यावेळी 91 धावांसह खेळपट्टीवर होता. राहुलने जर पुढच्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर षटकार मारला असता, तर त्याचे शतक पूर्ण झाले असते. याच कारणास्तव 42व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर त्याने चौकार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा चेंडू चौकार न जाता थेट षटकार केला. या षटकारामुळे संघाला विजय मिळाला, पण राहुलचे शतक होऊ शकले नाही. सामना संपल्यानंतर त्याने शतक होऊ न शकल्याची खंत बोलून दाखवली. राहुल म्हणाला की, “एक चौकार आणि एक षटकार मारून मला शतक करायचे होते. पण आशा आहे पुन्हा कधीतरी ते शतक मला करता येईल.”
KL Rahul said “I wanted to get a hundred by going 4 & 6 – hopefully some other time I can get it”. (smiles) pic.twitter.com/0mKUb6iEg7
— Johns. (@CricCrazyJohns) October 8, 2023
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारतासाठी विराट कोहली याने 85 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. गोलंदाजी विभागात देखील भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी या सामन्यात करून दाखवली. रविंद्र जडेजा याने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन, दोन विकेट्स नावावर केल्या. ऑस्ट्रेलियासाठी जोश हेसलवूड याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. फलंदाजांमध्ये पाहुण्या संघातील एकालाही अर्धशतक करता आले नाही. पण स्टीव स्मिथ याने 46 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. (‘I didn’t want to hit a six on the last ball’, Rahul himself admitted after the victory)
विश्वचषकातील पाचव्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया – डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्युशेन, ग्लेन मॅक्सवेल, ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), कॅमरून ग्रीन, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, ऍडम झम्पा, जोश हेझलवूड.
महत्वाच्या बातम्या –
आरंभ है प्रचंड! विराट-राहुलच्या यादगार खेळ्यांनी मिशन वर्ल्डकपची विजयी सुरुवात, ऑस्ट्रेलिया पराभूत
“मी शॉवर घेऊन आलो आणि…”, मॅचविनिंग खेळीनंतर राहुलचा मोठा रहस्यभेद