भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे सध्या इंग्लड दौऱ्यावर असून तो न्यूझीलंड विरुद्ध विश्वकसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी तयार आहे. हा सामना 18 ते 22 जूनदरम्यान साऊथॅम्पटन येथे होणार आहे. या सामन्याआधी रहाणेने अनेक विषयांवर आपली मतं व्यक्त केली आहेत. यादरम्यान, त्याने त्याच्यावर होणाऱ्या टीकेला कशाप्रकारे सामोरे जातो, याबद्दलही प्रतिक्रिया दिली आहे.
अजिंक्य रहाणेने सांगितले की तो थोड्या-फार ‘टिकेने’ निराश होत नाही. लोक आपल्याविषयी काय विचार करतात याने तो निराश होत नाही. त्याचे लक्ष नेहमी आपल्या संघाच्या विजयात अधिकाधिक योगदान कसे देण्यात येईल याकडे असते.
मागच्या काही वर्षांपासून त्याच्या कामगिरीत चढउतार बघायला मिळत आहे तरीही तो विश्वकसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याऱ्या करण्याऱ्या फलंदाजांमध्ये प्रथम स्थानी आहे. गेल्या 2 वर्षात त्याने 1095 धावा या स्पर्धेत केल्या आहेत. भारतीय संघाच्या न्यूझीलंड विरुद्धच्या अंतिम सामन्याविषयी तो सांगतो की, ‘ही खूपच विशेष भावना आहे.’
जेव्हा त्याला विचारले गेले की जेव्हा धावा करण्यात अयशस्वी ठरल्यानंतर तो आपल्यावरील ‘टिकांकडे’ कशा रितीने बघतो? यावर उत्तर देतांना त्याने सांगितले की, ‘मी टीका केल्यामुळे हैराण होत नाही. मला वाटते की या सर्व टीका, दोषदर्शन यांमुळेच याठिकाणी पोहोचलो आहे. जरी लोक माझ्यावर टीका करत असले तरी कायमच मी माझ्याकडून सर्वश्रेष्ठ देण्याचा प्रयत्न करतो.’
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करण्याऱ्या अजिंक्य रहाणेने सांगितले की, ‘देशासाठी आपलं सर्वश्रेष्ठ देणे हे माझ्यासाठी सर्वात महत्वपूर्ण बाब आहे आणि मग फलंदाजी असो की क्षेत्ररक्षण मी नेहमी आपलं योगदान देण्यासाठी प्रयत्नशील असतो.’
त्याने सांगितले की, ‘मी टीकाटिप्पणीबद्दल जास्त विचार करीत नाही. माझ्यावर टिका करणे हे लोकांचे काम आहे, ते त्या पद्धतीने माझ्याबद्दल विचार करतात. मी या गोष्टींवर नियंत्रण ठेऊ शकत नाही. त्यामुळे मी त्याच गोष्टींवर लक्ष देतो ज्यांवर मला नियंत्रण ठेवता येईल, आणि सर्वश्रेष्ठ देण्याचा प्रयत्न करतो , मेहनत करतो आणि त्यानंतर परिणाम मलाच दिसून येतो.
रहाणेने सांगितले की त्याने 40 धावा जरी केल्या तरी चालतील फक्त त्या धावा संघासाठी उपयुक्त ठरल्या पाहिजेत, तेव्हाच त्याला आनंद होईल. त्याने सांगितले, ‘मी माझा नैसर्गिक खेळ खेळेल. विजय प्राप्त करणे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मग भलेही माझं शतक होवो ना होवो. मला स्वतःला जास्त दबावात आणलेले आवडत नाही, त्यामुळे माझे 30 किंवा 40 जरी संघासाठी महत्वपूर्ण असल्या तरी मला आनंद होईल.’
महत्त्वाच्या बातम्या –
‘भारतातील ‘हे’ शहर माझे दुसरे घरच,’ आयपीएलमधील स्टार खेळाडू झालाय भारताचा दिवाना
…म्हणून हर्षा भोगले यांनी WTC च्या अंतिम सामन्यात समालोचन करण्यास दिला नकार
असा इनस्विंग तुम्ही पाहिला नसेल! ‘या’ गोलंदाजाने टाकलेला चेंडू पाहून चाहत्यांना आली अक्रमची आठवण