सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या (WIvsIND) दौऱ्यावर आहे. भारताने वनडे मालिकेनंतर टी२० मालिकेचीही विजयी सुरूवात केली. या सामन्यातून अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचे संघात पुनरागमन झाले. संघात पुनरागमन झाले नाही तोच त्याला टी२० विश्वचषकात खेळवू नये, असे धक्कादायक विधान भारताच्या माजी क्रिकेटपटूने केले आहे.
रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याला वेस्ट इंडिज विरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी संघात स्थान मिळाले आहे. याआधी त्याला टी२० सामन्यांसाठी फारच कमी वेळा संधी देण्यात आली आहे. मागील वर्षी झालेल्या टी२० विश्वचषकानंतर तो न्यूझीलंड विरुद्ध खेळला. नंतर त्याला थेट वेस्ट इंडिज विरुद्ध संघात घेतले आहे. यावरून भारताचा माजी यष्टीरक्षक पार्थिव पटेल (Parthiv Patel) याच्या मते, “अश्विनला पुढील सामन्यात बाकावर बसवले जाईल, तर त्याला टी२० विश्वचषकातही घेणार नाहीत.”
पार्थिवने क्रिकबजशी बोलताना म्हटले, “वेस्ट इंडिज विरुद्धच्या पुढच्या सामन्यात रवी बिश्नोई खेळवले जाईल. तसेच अश्विन टी२० विश्वचषकातही त्याला संघात जागा मिळणे निश्चित नाही. त्याच्याऐवजी रवि बिश्नोई, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांना संधी देण्याचा मी विचार करेल.”
या सामन्यात अश्विनने नाबाद १३ धावा केल्या. गोलंदाजीतही त्याने ४ षटके टाकताना २२ धावा देत २ विकेट्स घेतल्या. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ५२ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ६३ विकेट्स घेतल्या आहेत.
वेस्ट इंडिज विरुद्ध भारताने पहिल्या टी२० सामन्यात ६८ धावांनी विजय मिळवला. यामध्ये भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ विकेट्स गमावत १९० धावा केल्या. यामध्ये दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने झंझावाती खेळी केली आहे. त्याने १९ चेंडूत ४१ धावा केल्या. प्रत्युत्तरात यजमान संघ ८ बाद १२२ धावाच करू शकला. अश्विनबरोबरच अर्शदीप सिंग आणि बिश्नोई यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मेयर्सची विकेट, अर्शदीपचं सेलिब्रेशन अन् आयपीएल कनेक्शन!’ भारताच्या माजी दिग्गजाचे स्पष्टीकरण
दुसऱ्या टी२० सामन्यापूर्वी करणार ‘ही’ खास तयारी! खुद्द विंडीजच्या कर्णधारानेच सांगितलंय