John Buchanan On David Warner: ऑस्ट्रेलिया संघाचे माजी प्रशिक्षक जॉन बुकानन यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला महान फलंदाज डेव्हिड वॉर्नर याच्यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. डेव्हिड वॉर्नरला आपण महान खेळाडू मानत नाही आणि त्याला महान खेळाडूंच्या यादीत ठेवता येणार नाही, असे जॉन बुकानन यांनी म्हटले आहे. बुकाननच्या मते, डॉन ब्रॅडमन, ग्लेन मॅकग्रा आणि शेन वॉर्न यांच्यासारखे खेळाडू महान होते, डेव्हिड वॉर्नर नाही. मात्र, वॉर्नरने तिन्ही फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्याने त्याचे कौतुक केले आहे.
ऑस्ट्रेलियन संघाचा दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पाकिस्तानविरुद्धचा सिडनी कसोटी सामना त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना होता. आता त्याने आपल्या उत्कृष्ट कसोटी कारकिर्दीला निरोप दिला आहे. डेव्हिड वॉर्नरने 112 कसोटी सामन्यांमध्ये 8786 धावा केल्या, ज्यात 26 शतके आणि 37 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या कारकिर्दीत त्याने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपही जिंकली. 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात करणारा डेव्हिड वॉर्नर हा कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधील महान सलामीवीरांपैकी एक मानला जातो. त्याने आपल्या स्फोटक शैलीने गोलंदाजांना झोडपून काढले होते. (i dont see david warner in greatest players category says john buchanan)
जॉन बुकानन (John Buchanan) याच्या म्हणण्यानुसार, वॉर्नरने नक्कीच चांगली कामगिरी केली आहे परंतु त्याने फार मोठे असे काही केले नाही ज्यामुळे त्याला महान म्हणता येईल. सेन ब्रेकफास्टवर बोलताना तो म्हणाला, “डेव्हिड वॉर्नरने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत चांगली कामगिरी केली आहे. त्याने 8000 हून अधिक धावा केल्या आणि 100 हून अधिक कसोटी सामने खेळले. याशिवाय त्याने 160 हून अधिक एकदिवसीय सामने आणि सुमारे 100 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याची कामगिरी चांगली झाली आहे. परंतु, महान खेळाडू ते आहेत ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीत असे काही केले आहे जे इतर करू शकत नाहीत. डॉन ब्रॅडमन, (Don Bradman) ग्लेन मॅकग्रा, (Glenn McGrath) शेन वॉर्न (Shane Warne) सारखे हे सर्व माझ्या मते महान खेळाडू आहेत. इतर खेळाडू जवळ येऊ शकतात पण ते महान नाहीत आणि मला डेव्हिड वॉर्नर त्या श्रेणीत दिसत नाही.” (I don’t think David Warner is a great player the shocking statement of the coach who won the World Cup for Australia)
हेही वाचा
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिका खेळण्याबाबत शमीचं मोठं विधान, म्हणाला, ‘मी माझ्याकडून पूर्ण…’
IND vs ENG: रोहित शर्माला घाबरला इंग्लंड संघ; डाॅन ब्रॅडमनशी केली जातेय तुलना, वाचा नक्की प्रकरण काय