Hardik Pandya Mumbai Indians Captain: क्रिकेट जगतात सध्या सातत्याने एका गोष्टीची जोरदार चर्चा रंगली आहे. ती अशी की, रोहित शर्मा याला हटवून हार्दिक पंड्या याला मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार बनवणे योग्य आहे की नाही? प्रत्येक चाहता आणि क्रिकेटतज्ज्ञ आपापली मते मांडताना दिसत आहे. अशातच भारतीय संघाचा माजी खेळाडू आकाश चोप्रा यानेही आपले मत मांडले आहे. पंड्याविषयी आकाश चोप्राचे विधान आता चर्चेचा विषय ठरत आहे.
जिओ सिनेमाच्या ‘आकाशवाणी’ (Aakashvani) या शोमध्ये बोलताना आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने मोठी प्रतिक्रिया दिली. तो मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाच्या कर्णधाराच्या रूपात हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नियुक्ती आणि कर्णधाराच्या रूपात रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्या योगदानाविषयी बोलला. विशेष म्हणजे, 19 डिसेंबर रोजी आयपीएल 2024 (IPL 2024) स्पर्धेचा लिलाव दुबईत होणार आहे.
हार्दिक पंड्याला कर्णधार बनवण्यावर काय म्हणाला चोप्रा?
हार्दिक पंड्याला कर्णधार बनवण्याविषयी आकाश चोप्रा याने म्हटले, “हे माझ्या समजण्यापलीकडचे आहे. तसेच, आतल्या गोटातली बातमी नाहीये. जेव्हा हार्दिकने गुजरातमधून जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा कर्णधारपद त्याचा एक भाग राहिला असेल. या निर्णयाविषयी रोहितलाही नक्कीच सांगितले गेले असेल. रोहितला मुंबई इंडियन्सच्या भविष्यातील योजनांबाबतही माहिती देण्यात आली असावी.”
पुढे बोलताना तो म्हणाला की, “मला वाटते, हार्दिकला गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार बनवण्यात आशिष नेहराची जबरदस्त भूमिका होती. त्यांना हार्दिकला मैदानावर त्याच प्रदर्शनाची पुनरावृत्ती करण्यासाठी एका वेगळ्या प्रकारचे मार्गदर्शन करावे लागेल. कारण मला वाटत नाही की, कर्णधाराच्या रूपात हार्दिक सध्या पूर्णपणे तयार आहे.”
रोहितविषयी चोप्राचे मत काय?
दुसरीकडे, रोहितविषयी आकाश चोप्रा म्हणाला की, “रोहित एक दिग्गज आहे. हा एका युगाचा अंत आहे. त्याने 10 वर्षे संघाचे नेतृत्व केले आणि 5 वेळा आयपीएल किताब जिंकून दिला. यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आणि खूप नावही कमावले. मात्र, एक वेळ अशी येते, जेव्हा तुम्ही भविष्याविषयी विचार करता. खरं सांगायचं झालं, तर त्यांनी आपल्यासाठी तयार केलेली मापदंड पाहता, मागील 2 वर्षे मुंबईसाठी साधारण राहिली.”
तो असेही म्हणाला की, “कोणालाही योग्य वेळी संधी देणे खूप महत्त्वाचे आहे, पण हे निश्चित करणे आणखी महत्त्वाचे आहे की, कोणाला केव्हा जाऊ दिले पाहिजे. सोशल मीडियावर अशा गोष्टी सुरू आहेत की, रोहितला त्याच्या मनाने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेऊ दिला पाहिजे होता. तसेच, हार्दिककडे कर्णधारपद सोपवण्याच्या एका सामन्यापूर्वी रोहितला मुंबईचे नेतृत्व करण्याची परवानगी दिली पाहिजे होती. मी वैयक्तिकरीत्या याची सदस्यता घेतली नसती. संघापेक्षा मोठा कुणीच नाही.”
खरं तर, मुंबईने मागील महिन्यात हार्दिकला गुजरात टायटन्स संघाशी ट्रेड करत आपल्या ताफ्यात घेतले होते. यानंतर एक महिन्याने त्याला मुंबईचा कर्णधार बनवले. यामुळे मुंबईने अनेक निष्ठावंत चाहते गमावल्याचेही पाहायला मिळाले. मुंबईला इंस्टाग्रामवर 13.5 मिलियन फॉलोव्हर्स होते, पण रोहितला कर्णधारपदावरून काढताच संघाच्या फॉलोव्हर्समध्ये 10 लाखांची घसरण झाली. संघाचे सध्या फॉलोव्हर्स फक्त 12.3 मिलियन आहेत. (i dont think hardik pandya as a captain is a finished product yet said this former cricketer)
हेही वाचा-
ब्रेकिंग! नवीन उल हकवर ‘या’ टी20 लीगमधून 20 महिन्यांची बंदी, नेमकं प्रकरण काय? लगेच वाचा
IPL 2024 Auction: अश्विनची भविष्यवाणी! ‘या’ 2 खेळाडूंवर लागेल 14 कोटींपेक्षा जास्तीची बोली, घ्या जाणून