---Advertisement---

“मला नाही वाटत अश्विनचे वनडे आणि टी२० संघात पुनरागमन होईल,” गावसकरांचे मोठे भाष्य

On: सोमवार, फेब्रुवारी 22, 2021 10:54 AM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात जो रूटच्या २१८ धावांच्या खेळीमुळे भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ३१७ धावांनी इंग्लंड संघाला पराभूत केले होते. या सामन्याचा हिरो ठरला होता तो भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू आर अश्विन. अश्विनने या सामन्यात शतकिय खेळी केली होती. तसेच सामन्यात ८ गडी बाद केले होते. अशातच माजी भारतीय क्रिकेटपटूने अश्विनच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत खेळण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी अश्विनबद्दल वक्तव्य केले आहे. त्यांना नाही वाटत की, अश्विनचे भारताच्या एकदिवसीय आणि टी२० संघात पुनरागमन होईल. अश्विनने भारतीय संघासाठी शेवटचा एकदिवसीय आणि टी२० सामना वेस्ट इंडिजविरुद्ध २०१७ मध्ये खेळला होता. त्यानंतर संघात युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या फिरकी गोलंदाजांचे आगमन झाले होते. त्यांनतर अश्विनला मर्यादित षटकांच्या संघात संधी मिळायला बंद झाली.

याबाबतीत गावसकर यांनी एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “या अष्टपैलू खेळाडूसाठी मर्यादित संघात कुठेच स्थान नाहीये. याचे कारण असे की, टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांसाठी संघात रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या यांसारखे अष्टपैलू खेळाडू आहेत. अशातच मला नाही वाटत की ७ व्या क्रमांकासाठी अश्विनला संघात स्थान असेल. मला नाही वाटत की अश्विन या प्रकारासाठी फिट आहे. पण तो पुढील पाच-सहा वर्षे कसोटी सामन्यात खेळू शकतो.”

आर अश्विनची कामगिरी
आर अश्विनने आतापर्यंत खेळलेल्या ७६ कसोटी सामन्यांमध्ये २८.२ च्या सरासरीने २६२६ धावा केल्या आहेत. यात ५ शतक आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. यासोबतच त्याने ३९४ गडी देखील बाद केले आहेत. तसेच १११ एकदिवसीय सामन्यात ६७५ धावा केल्या आहेत आणि १५० गडी बाद करण्यात त्याला यश आले आहे. यासोबतच ४६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने १२३ धावा करत ५२ गडी बाद केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

“अनुष्का माझा आधारस्तंभ आहे, ती सदैव माझ्या पाठीशी…,” कोहलीने केलं बायकोचं तोंडभरुन कौतुक

भारत का इंग्लंड, अहमदाबाद कसोटीत कोणाचे पारडे जड? इंग्लिश दिग्गजाने सांगितले नाव

अन्यथा संघाच्या नावातून ‘हैदराबाद’ काढून टाकावे लागेल; माजी मंत्रींची ‘ऑरेंज आर्मी’ला धमकी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---