भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत. त्यात विरेंद्र सेहवागने एक नविन माहिती दिली आहे.
त्याने गांगुलीला चॅपेल यांनी बीसीसीआयला केलेल्या ईमेलबद्दल सर्वप्रथम माहिती दिली होती, असे सांगितले आहे. भारत 2005च्या झिंबॉम्बे दौऱ्यावर असताना चॅपेल यांनी बीसीसीआयला गांगुली विरूद्ध एक ईमेल केला होता.
हा ईमेल चॅपेल टाइप करत असताना सेहवागने पाहिले होते. त्यानंतर त्याने गांगुलीला याबद्दल सांगितले. याविषयी तो बोरीया मुजुमदारांच्या इलेव्हन गॉड्स अँड अ बिलियन इंडियन्स या पुस्तकाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होता.
सेहवाग म्हणाला,” मी क्षेत्ररक्षणाच्यावेळी थोडी विश्रांती घ्यायचो. मला कमीतकमी 5 षटकांची विश्रांतीची गरज असायची. मी नेहमीच पंचाना सांगायचो की माझ खूप पोट दुखतय आणि मैदानातून बाहेर जायचो.
“यावेळी ग्रेग हे एक ईमेल लिहित होते आणि मी त्यांच्या बाजुला बसलो होतो. तेव्हा मी त्यांना बीसीसीआयला काहीतरी लिहिताना पाहिले आणि मी त्याबद्दल गांगुलीला सांगितले की चॅपेल काहीतरी गंभीर गोष्ट करत आहे.
चॅपेल यांनी मे २००५मध्ये भारतीय संघांचे प्रशिक्षकपद स्विकारले होते. त्यानंतर ते एक चांगलेच वादग्रस्त प्रशिक्षक ठरले.