---Advertisement---

“तुम्हाला तुलना करायची असेल तर, मी बहुतेक खेळाडूंपेक्षा चांगली कामगिरी केली”, भारतीय खेळाडूने दिली प्रतिक्रिया

On: रविवार, मे 16, 2021 7:01 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर बर्‍याच दिवसांपासून संघाबाहेर आहे. विश्वचषक 2019 नंतर शंकरला पुन्हा संघात स्थान मिळू शकलेले नाही. वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू म्हणून त्याला संघात स्थान मिळायचे, पण आता त्याच्याकडे सतत दुर्लक्ष केले जात आहे. दरम्यान, संघात निवड न होण्याबाबत शंकरने आता मोठे विधान केले आहे.

संघात सातत्याने जागा मिळत नसल्याने अखेर विजय शंकर म्हणाला की त्याला संघात जागा मिळवायची आहे. केवळ हार्दिक पंड्याची संघातील भूमिका बदलली असल्यामुळे शंकरला स्थान नकोय तर त्याच्यावर अनेकांनी त्यावेळी विश्वास दाखवला होता म्हणून त्याला संधी हवी आहे.

शंकर इंडिया टूडेशी बोलताना म्हणाला, ‘मी आधीपासूनच सांगितले आहे की मला तुलना करणे आवडत नाही. पण जर तुम्हाला तुलना करायची असेल तर, मी बहुतेक खेळाडूंपेक्षा चांगली कामगिरी केली असे मला वाटते.’

शंकर पुढे म्हणाले की, ‘मी केवळ अष्टपैलू खेळाडू आहे, म्हणून मला भारतीय संघात जागा मिळावी असे मला वाटत नाही तर, मला संघात खेळायचे आहे कारण लोकांना माझ्या क्षमतेवर विश्वास असावा.’

शंकर 2019 विश्वचषकात भारतीय संघाचा भाग होता. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली होती. पण दुखापतीमुळे त्याला स्पर्धेच्या मध्येच माघार घ्यावी लागली होती. शंकर पुढे म्हणाला की, हे निश्चित आहे की ज्याने एकदा देशाचे प्रतिनिधित्व केले आहे, त्याला पुन्हा खेळायला आवडेल. जेव्हा मी चांगली कामगिरी केली तरी मला संधी दिली गेली नाही, तेव्हा नक्कीच मी निराश झालो होतो.’

भारतीय संघ आगामी काळात श्रीलंकेचा दौरा करणार आहे. हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत शंकरला संघात स्थान मिळते अथवा नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

“आशा आहे आयपीएल २०२१ पुन्हा सुरु होईल आणि मी त्यात खेळेल”, इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूने व्यक्त केला मानस

लढाई कोरोनाविरुद्धची! गरजवंतांच्या मदतीसाठी धावला शिखर धवन, ‘या’ योगदानाबद्दल पोलिसांनीही मानले आभार

इंग्लंडच्या कठीण दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला ‘अशाप्रकारे’ करावी लागेल कोरोना चाचणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---