---Advertisement---

मी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण

---Advertisement---

भारताचा आॅस्ट्रेलिया विरुद्धचा अॅडलेड ओव्हलवर पहिला कसोटी सामना 10 डिसेंबरला पार पडला. यानंतर 11 डिसेंबरला दुसऱ्या कसोटीसाठी पर्थला रवाना झाला.

या अॅडलेड – पर्थ विमान प्रवासात वेगवान गोलंदाजांना विश्रांती घेता यावी आणि त्यांना प्रवासाचा त्रास होऊ नये म्हणून  भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्माने त्यांचे बिजनेस क्लासचे सीट्स वेगवान गोलंदाजांना दिले होते. यामुळे त्यांचे अनेकांनी कौतुक केले होते. 

याची माहिती इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉगन यांनी ट्विट करुन दिली होती. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते की ‘विराट आणि त्याची पत्नी यांनी अॅडलेड – पर्थ या प्रवासासाठी त्यांचे बिजनेस क्लासचे सीट्स वेगवान गोलंदाजांना दिले आहेत, याचा मी साक्षीदार आहे. यामुळे वेगवान गोलंदाजांना आराम मिळेल. कर्णधार त्याच्या संघाला चांगला सांभाळत आहे.’

त्यांच्या या ट्विटवर इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने कमेंट केले होते की त्यांनीही(स्टोक्स) याआधी अशीच चांगली गोष्ट अनुभवली आहे. जेव्हा इंग्लंडचे प्रशिक्षक ट्रेवर बेलीस यांनी अशी चांगली वागणूक इंग्लंडच्या गोलंदाजांना दिली होती.

मात्र स्टोक्सच्या या ट्विटचा चाहत्यांनी चुकीचा अर्थ लावला आणि त्याला ट्रोल केले. त्यामुळे त्याने पुन्हा एकदा ट्विट करत त्याच्या कमेंटचे स्पष्टीकरण दिले आहे.

https://twitter.com/benstokes38/status/1072442240662933504

तो म्हणाला, ‘माझ्या मागील ट्विटमुळे काहीतरी गोंधळ झाला आहे. एक गोलंदाज म्हणून मी विराटने जे केले त्याचा खूप आदर करतो. मी फक्त इतकेच म्हणत होतो की आमच्या मुख्य प्रशिक्षकांनी आम्ही जेव्हा 2016ला भारताच्या दौऱ्यावर होतो तेव्हा आमच्या काही खेळाडूंसाठी असे याआधी केले आहे.’

https://twitter.com/benstokes38/status/1072560342511828992

स्टोक्सच्या या ट्विटला त्याचा संघसहकारी आणि इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडनेही पाठिंबा दिला आहे. तसेच ब्रॉडने म्हटले आहे की, तो खूप नशीबवान आहे, त्याला इंग्लंडचा माजी कर्णधार अलिस्टर कुक आणि सध्याचा कर्णधार जो रुट कडून अशी चांगली वागणूक मिळाली आहे.’

महत्त्वाच्या बातम्या:

भारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक?

जेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय?

विराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment