भारताचा मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचे आगामी टी20 विश्वचषकात खेळणे अशक्य दिसत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी शुक्रवारी (30 सप्टेंबर) बुमराहच्या दुखापतीबाबत आणि संघातील स्थानाबाबत वृत्त जाहीर केले आहे.दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी20 मालिकेतून बुमराह बाहेर झाला आहे. त्याच्याजागी मोहम्मद सिराज याला संघात समाविष्ट केले आहे. यामुळे सोशल मीडियावर जसप्रीत बुमराह ट्रेंड होत असून त्याने पाच वर्षापूर्वी केलेले ट्वीटही चांगलेच व्हायरल होत आहे.
भारतीय पुरूष क्रिकेट संघ एकीकडे डेथ ओव्हर्समुळे चिंतेत असताना जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) संघाबाहेर झाल्याने अडचणीत भर पडली आहे. त्याने 2017मध्ये एक ट्वीट केले आहे. जे सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. यामध्ये त्याने लिहिले, पुनरागमन हे नेहमीच सेटबॅकपेक्षा जबरदस्त असते. त्याने हे ट्वीट जेव्हा भारताची श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका सुरू होती तेव्हा केले होते. त्या मालिकेत भारताने श्रीलंकेला तिसऱ्या वनडे सामन्यात पराभूत करत दोन सामने शिल्लक असताना मालिका नावावर केली होती. तिसऱ्या वनडेमध्ये बुमराहने 10 षटकात 27 धावा देत 5 विकेट्स घेतल्या होत्या.
रिपोर्ट्सनुसार, बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे (Back stress fracture) त्रस्त आहे. त्याने नुकतेच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी20 मालिकेतून संघ पुनरागमन केले होते. तेव्हा तो दुखापतीतून सावरत आणि राष्ट्रीय क्रिकेट एकॅडमीमध्ये (एनसीए) रिहॅबिलिटेशन पूर्ण करून संघात परतला होता, मात्र त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धचा मोहाली येथे झालेला पहिला सामना खेळला नाही. तसेच त्याने उर्वरित दोन सामन्यात गोलंदाजी केली. त्यावेळी त्याला केवळ एकच विकेट घेता आली. तसेच त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 संघात सामील केले, मात्र त्या मालिकेतीलही पहिला सामना तो खेळला नाही. आता तर तो संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला आहे, यावरून त्याची दुखापत गंभीर असल्याचे समजते.
https://twitter.com/Jaspritbumrah93/status/901888221524537345?s=20&t=SR4kl5CWNgqakc_inl1xAw
ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल ठरतात, मात्र भारताचा महत्वाचा खेळाडू या स्पर्धेत खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे. काही रिपोर्ट्सनुसार तो टी20 विश्वचषकासही मुकणार असे वृत्त समोर येत असले तरी बीसीसीआयने अधिकृतपणे जाहीर केलेले नाही.
ऑस्ट्रेलियात बुमराहने 6 टी20 सामन्यात 8 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध 13 टी20 सामन्यांत 16 विकेेट्स घेतल्या आहेत. त्याने 60 आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 6.62च्या सरासरीने 70 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 2021च्या टी20 विश्वचषकामध्ये 5 सामन्यांत 7 विकेट्स घेतल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बुमराहचे करीयर संपले का? आयसीसीच्या डॉक्टरांनी दिले असे उत्तर
टी-20 विश्वचषक जिंकणारा संघ होणार मालामाल! आयसीसीने केली बक्षीसांची घोषणा