---Advertisement---

तब्बल सात महिन्यानंतर पुन्हा होणार भारतात ‘किक-ऑफ’; ही स्पर्धा होतेय आजपासून सुरू

On: गुरूवार, ऑक्टोबर 8, 2020 5:38 PM
---Advertisement---

कोविड-१९ मुळे ठप्प झालेले भारतीय क्रीडाक्षेत्र हळूहळू पूर्वपदावर येण्यास सज्ज आहे. सात महिन्यांच्या अंतरानंतर आज आय-लीगच्या पात्रता फेरीच्या सामन्यांना आज कोलकाता येथे प्रारंभ होत आहे. कोलकाता येथील विवेकानंद युबा भारती क्रीडांगण आणि कल्याणी येथील कल्याणी स्टेडियमवर हे सामने होतील.

मोहम्मदीन स्पोर्टिंग क्लब, एफसी बेंगलुरू युनायटेड, भवानीपूर एफसी, गढवाल एफसी आणि एआरए एफसी या पाच संघांदरम्यान राऊंड रॉबिन पद्धतीने हे सामने खेळले जातील. स्पर्धेचा शुभारंभ भवानीपूर एफसी आणि एफसी बेंगलुरू युनायटेड यांच्यातील सामन्याद्वारे होईल. १४ मार्च रोजी गोवा येथे झालेल्या इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) अंतिम सामन्यानंतर भारतात खेळला जाणारा हा पहिलाच फुटबॉल सामना असेल.

दिवसातील दुसरा सामना, कल्याणी स्टेडियमवर मोहम्मदीन स्पोर्टिंग क्लब विरुद्ध गडवाल एफसी यांच्यात रंगणार आहे. १३० वर्ष जुना असलेला मोहम्मदीन स्पोर्टिंग क्लब २०१३-१४ च्या हंगामात अखेरच्या वेळी आय-लीगमध्ये सहभागी झाला होता. कोविंड-१९ चा धोका पूर्णपणे टळला नसल्याने स्पर्धेतील सर्व सामने बंद दाराआड खेळविले जातील.

ईस्ट बंगाल आणि मोहन बागान आयएसएलमध्ये दाखल झाल्यानंतर कोलकाताच्या दोन्ही संघांवर दबाव अधिक आहे. कारण, सध्या आय-लीगमध्ये कोलकाताचा कोणताही संघ नाही. ही जागा भरण्यासाठी मोहम्मदीन एससी आणि भवानीपूर एफसी जोरदार प्रयत्न करतील.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---