दंगल चित्रपटामुळे आपले खेळावरील लक्ष कमी झालेच्या मत भारताची अनुभवी कुस्तीपटू गीता फोगाटने व्यक्त केले आहे. या चित्रपटामुळे आपल्याभोवती मोठे वलय निर्माण झाले आणि याचाच फटका आपल्याला बसल्याचे गीताचे म्हणणे आहे.
२०१०च्या एशियन गेम्समध्ये गीताने सुवर्णपदक जिंकले होते.
“मी पुन्हा कुस्तीत चांगली कामगिरी करण्यासाठी कठोर मेहनत घेत आहे. परंतु तुम्ही जर खेळापासून खूप दिवस दुर राहिलात तर पुनरागमन करणे कठीण असते. मी दुखापत आणि चित्रपटामुळे तब्बल दोन वर्ष खेळापासून दुर राहिले. यामुळे माझे खेळावरील लक्ष काही काळ कमी झाले होते. ” असे गीता म्हणाली.
“भारतीय महिला कुस्तीपटूंनी गेल्यावेळी दोन पदके घरी आणली होती परंतु चांगली कामगिरी केली होती. तसेच आताही त्यांचा सराव चांगला आहे. विनेश, साक्षी आणि पुजामध्ये आत्मविश्वास दिसत आहे. यावेळी ते नक्की जास्त पदके आणतील.” असा विश्वास यावेळी तीने व्यक्त केला.
“अाता सर्वच खेळाडू हे जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहे. खेळाडूंचे खेळाबद्दलचे विचार आता बरेच बदलले आहेत. दंगल चित्रपटामुळे कुस्ती खेळाकडे मुलींचा ओढा वाढला आहे. तसेच साक्षी मलिकने जेव्हा आॅलिंपिकला पदक जिंकले तेव्हा त्याचाही ह्या खेळाच्या प्रसाराला उपयोग झाला. ” असेही ती म्हणाली.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–खास स्टोरी- सॅम आणि टॉम करननंतर तिसरा भाऊही क्रिकेटमध्ये करतोय चमकदार कामगिरी
–खेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम इंडियाला खास संदेश
–टीम इंडियाने वाहिली अजित वाडेकरांना श्रद्धांजली