---Advertisement---

हा क्रिकेटपटू आपल्या मुलीला करतोय मिस; म्हणाला बऱ्याच दिवसांपासून झाली नाही भेट

On: सोमवार, सप्टेंबर 14, 2020 4:28 PM
---Advertisement---

मुंबई । आई-वडिलांमध्ये होणाऱ्या वादामुळे मुले अडकून पडतात. अशीच घटना मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहां यांच्यात आहे. या दोघांमध्ये वाद आहे. यामुळे क्रिकेटर मोहम्मद शमीला आपली मुलगी आयराला भेटता आले नाही. याबद्दल सांगताना तो भावूक झाला.

वास्तविक, मोहम्मद शमी सध्या संयुक्त अरब अमिराती (युएई) मध्ये आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब (केएक्सआयपी) कडून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये खेळण्याची तयारी करत आहे. एका मुलाखतीदरम्यान, जेव्हा त्याच्या मुलीचा विषय निघाला की तो भावनिक झाला. तो म्हणाला, ‘मला लॉकडाऊनमध्ये मुलगी आयरा भेटली नाही. ती लवकर मोठी होत आहे. मला तिची आठवण येते.’

आयरा ही तिची आई म्हणजे मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहां यांच्यासोबत राहते. हसीनने शमीवर मॅच फिक्सिंग आणि फसवणुकीसह अनेक गंभीर आरोप केले होते, ज्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. तिने या क्रिकेटपटूविरूद्ध एफआयआरही दाखल केला. इतकेच नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने अनेकदा शमीवर निशाणा साधला आहे. यामुळे शमीच्या चाहत्यांनी तिला लक्ष्य केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---