लखनऊ सुपर जायंट्ससाठी मार्कस स्टॉयनिस आणि निकोलस पूरन यांनी धमाकेदार खेळी केली आणि संघाला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध विजय मिळवून दिला. लखनऊचा कर्णधार केएल राहुल याने स्टॉयनिस आणि पूरनचे या प्रदर्शनासाठी कौतुक केले. राहुलने या सामन्यातील वैयक्तिक प्रदर्शन पाहिले, तर तो संघाला महागात पडला. असे असले तरी, राहुलला याविषयी कुठलीच खंत वाटत नाही. मी योग्य पद्धतीने खेळलो, अशी प्रतिक्रिया राहुलने विजयानंतर दिली.
लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB vs Lucknow Super Giants) यांच्यातील हा सामना सोमवारी (10 एप्रिल) बेंगलोरच्या एम चिन्नस्वामी स्टेडियमवर खेळला गेला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना लखनऊपुढे विजयासाठी 213 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात लखनऊला अपेक्षित सुरुवात मिळाली नाही. सलामीवीर कायल मेयर्स शून्य, तर केएल राहुल (KL Rahul) 20 चेंडूत 18 धावा करून बाद झाले. तिसऱ्या क्रमांकावरील दीपक हुड्डा 9, तर कृणाल पांड्याने शून्य धावांवर विकेट गमावल्या. मात्र, त्यानंतर आलेल्या मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) आणि निकोलस पूरन (Nicholas Pooran) यांनी अनुक्रमे 65 आणि 62 धावा केल्या. या दोघांच्या योगदानामुळे लखनऊ संघ विजय मिळवू शकला.
सामना नावावर केल्यानंतर माध्यमांशी चर्चा करताना केएल राहुल म्हणाला, “मी जर अजून काही धावा केल्या असता, तर स्ट्राईक रेट देखील चांगला असता. मी परिस्थिती पाहून फलंदाजी केली आणि मला वाटते की, मी योग्य केले. एक-दोन चांगल्या इनिंग्जनंतर माझा स्ट्राईक रेट सुधारण्याची अपेक्षा आहे.” दरम्यान, राहुलने या सामन्यात अवघ्या 90.00च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. दुसरीकडे पूरनने मात्र अवघ्या 15 चेंडूत हंगामातील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले. पूरनने 19 चेंडूत 326.31च्या स्ट्राईक रेटने 62 धावा कुटल्या.
दरम्यान, सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर चाहत्यांसाठी हा एतिशय थरारक अनुभव होता. लखनऊला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर एक धाव हवी होती. हर्षल पटेलने टाकलेला शेवटचा चेंडू स्ट्राईकवर असलेल्या आवेश खान याला खेळता आला नाही. पण आरसीबीचा अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिक याच्याकडून मोठी चूक झाली. यष्टीपाठी चेंडू पकडताना कार्तिक गडबडला आणि लखनऊच्या फलंदाजांनी संघाला आवश्यक असलेली एक धाव घेतली. (I played well! Read what KL Rahul who scored 18 off 20 balls had to say)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तू कधीपर्यंत असा खेळणार?’, राहुलच्या संथ फलंदाजीने संतापला भारतीय दिग्गज, ट्विट करत केली कानउघडणी
षटकार मारूनही धावसंख्या तितकीच! पाहा 19व्या षटकात बदोनीने कशी गमावली विकेट