मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात शनिवारी (१६ एप्रिल) मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात सामना पार पडला. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने १८ धावांनी विजय मिळवला. मात्र, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाला आयपीएलच्या १५ व्या हंगामात सलग ६ व्या पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर मुंबई इंडियन्स संघावर मोठ्याप्रमाणात टीका होत आहे. त्यावर आता सहाव्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित (Rohit Sharma) मुंबई इंडियन्स संघाच्या (Mumbai Indians) पराभवाची जबाबदारी घेण्यास तयार आहे. तो शनिवारी लखनऊ विरुद्ध (MI vs LSG) झालेल्या पराभवानंतर म्हणाला, ‘जर मला माहित असते की, काय चूकत आहे, तर मी ती गोष्ट ठीक केली असती. पण हे चक्र संपतच नाहीये. मी प्रत्येक सामन्यासाठी त्याचप्रमाणे तयारी करत आहे, जशी नेहमी करतो. मी काहीही वेगळे करत नाहीये.’
रोहित आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) अपेक्षित कामगिरीही करू शकलेला नाही. त्याने ६ सामन्यांत केवळ १९ च्या सरासरीने ११४ धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याने पराभवाची जबाबदारी घेत असल्याचे म्हणले आहे. तो म्हणाला, ‘संघाला माझ्याकडून अपेक्षा असलेल्या परिस्थितीत न ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी मी घेतो. मी मैदानात जाऊन खेळाचा तसाच आनंद घेऊ इच्छीत आहे, जसा मी गेल्या अनेक वर्षांत घेत आलो आहे. आता हे महत्त्वाचे आहे की, आम्हाला पुढचा विचार करावा लागेल. हा काही जगाचा अंत नाही. आम्ही यापूर्वी पुनरागमन केले आहे आणि आम्ही यावेळीही पुनरागमन करण्याचा प्रयत्न करू.’
त्याचबरोबर लखनऊ विरुद्ध जसप्रीत बुमराहकडून गोलंदाजीची सुरुवात करण्यात आली नव्हती. या निर्णयाबद्दल बोलताना रोहित म्हणाला, ‘बुमराहने चांगली गोलंदाजी केली, पण दुसऱ्यांना पण आपला स्थर थोडा वाढवण्याची गरज आहे. आम्ही प्रत्येक सामन्यात चांगल्या कामगिरीसाठी प्रयत्न करत आहोत. आम्ही सलग ६ सामने पराभूत झालो आहोत. आम्ही हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत की, आमचे योग्य संघसंयोजन काय आहे. पण काही गोष्टी प्रतिस्पर्धी संघावरही अवलंबून असतात.’
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
‘टीम इंडियात पुनरागमनासाठी काहीपण’, दिनेश कार्तिकने ठोकली दावेदारी
IPL2022| पंजाब वि. हैदराबाद सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
…म्हणून तब्बल ८०० विकेट घेणाऱ्या मुरलीधरनला साध्या ८० विकेट्सही घेता आल्या नसत्या!