2008 साली 19 वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले होते.
या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण अाफ्रिकेचा 12 धावांनी पराभव केला होता.
आपल्या संघाचा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभव होऊनही हा सामना दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज पिटर मालनच्या मनावर कायमचा कोरला गेला आहे. असे पिटर मालनने एका क्रिकेट संकेत स्थळाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
याचे कारण म्हणजे या सामन्यात पिटर मालनने या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला 19 धावांवर बाद केले होते.
सध्या पिटर मालन दक्षिण आफ्रिका अ संघाबरोबर भारत दौऱ्यावर आला आहे. यावेळी क्रिकेट संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत त्याने 2008 सालच्या 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकातील आठवनींणा उजाळा दिला.
“या सामन्यात माझ्या स्पेलच्या पहिल्याच चेंडूवर कोहलीने मला षटकार मारला. त्यानंतर पुढचा चेंडू टाकताना मी त्या चेंडूचा वेग कमी केला आणि कोहलीने पॉइंन्टला मारलेल्या त्या शॉटवर सीग्रँन्ड अँगलब्रेचने अप्रतिम झेल घेतला. मी आजही मला नवीन कोणी भेटल्यास त्यांना मी सांगत असतो की विराटसारख्या सर्वोत्तम फलंदाजाला मी एकदा बाद केले होते.” असे पिटर मालन म्हणाला.
तसेच पुढे पिटर मालनने आज विराट कोहलीने जे यश मिळवले आहे त्याबद्दल त्याचे कौतूक केले.
“कोहली हा असामान्य क्रिकेटपटू आहे. 2008 सालीही विराट आज आहे तितकाच आक्रमक होता. तसेच फिरकी गोलंदाजांना इतके सहजपणे खेळताना त्यावेळी मी कोणालाही पाहिले नव्हते.” असे पिटर मालन म्हणाला.
आज दहा वर्षांनंतर विराट कोहलीने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत खूप मोठा पल्ला गाठला आहे. तसेच भारताच्या वरीष्ठ क्रिकेट संघाच्या कर्णधार पद मिळवले आहे.
तर दुसरीकडे 128 प्रथम सामने खेळलेला पिटर मालन दक्षिण आफ्रिकेकडून आतंराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याच्या प्रतिक्षेत आहे.
त्याच्याबरोबर 2008 सालचा विश्वचषक संघातील सहकारी वेयान पार्नेल आणि रायली रुसोला केव्हाच दक्षिण आफ्रिकेकडून आतंराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
-विराट कोहलीला सल्ला देणे माजी भारतीय क्रिकेटपटूला पडले महागात
-एसेक्स क्रिकेट क्लबवर कोहलीच्या चाहत्यांचा जोरदार बाउंसर