ऑस्ट्रेलियन संघाचा सलामीवीर फलंदाज उस्मान ख्वाजा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. ऍशेस 2023च्या पहिल्याच सामन्यात ख्वाजाने शतक ठोकले. ख्वाजा सध्या ऑस्ट्रेलियन संघाचा महत्वाचा फलंदाज असला, तरी दोन वर्षांपूर्वी परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. त्याला असे वाटत होते की, कसोटी क्रिकेटमधील त्याची कारकीर्द संपली आहे. पण आपल्या गुणवत्तेच्या जोरावर त्याने पुन्हा संघात जागा बनवली आणि सध्या प्रमुख फलंदाजाची भूमिका पार पाडत आहे. शतक ठोकल्यानंतर ख्वाजा माध्यमांसमोर याविषयी व्यक्त झाला.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (ENGvsAUS) यांच्यातील ऐतिहासिक ऍशेस मालिका (Ashes Series 2023) बुधवारी (16 जून) सुरू झाली. मालिकेतील पहिला सामना बर्मिंघमच्या एजबस्टन कसोटीत खेळला जात आहे. पहिल्या डावात इग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 393 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 386 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियासाठी उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) याने सर्वाधिक 141 धावांची खेळी केली. यष्टीरक्षक ऍलेक्स कॅरी याने 66, तर ट्रेविस हेड याने 50 धावांचे योगदान दिले. ख्वाजाने 2021 साली कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याआधी 44 कसोटी सामने खेळळे होते. त्याने स्वतःही कसोटी संघात पुनरागमनाच्या आशा सोडल्या होत्या आणि आपल्या कारकिर्दीवर समाधानी देखील होती.
कसोटी क्रिकेटमधील पुनरागमनाविषयी ख्वाजाने सांगितले की, “खरं सांगायचं तर 44 कसोटी सामने खेळल्यानंतर मला असं वाटलं होतं की, माजी कसोटी कारकीर्द संपली आहे. मी आनंदी होते कारण अशे अनेक खेळाडू आहेत, ज्यांना 44 कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली नाहीये. मी आठ शतके केली होती. ऍशेस विजेत्या संघाचा भागही राहिलो होतो. ऑस्ट्रेलियन संघासोबत अनेक मालिका मी जिंकल्या होत्या. त्यामुळे पुन्हा खेळण्याची संधी मिळाली तेव्हा प्रत्येक सामना बोनस असल्यासारखे वाटते.”
दरम्यान, ऍशेस 2023मध्ये उस्मान ख्वाजाकडून ऑस्ट्रेलियन संघ आणि चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. याविषयी बोलताना त्याने असेही सांगितली की, ही मालिका सुरू होण्याआधी तो चांगल्या मानसिक स्थितीमध्ये होता. (‘I thought my Test career was over…’ said the Australian opener after scoring a century)
महत्वाच्या बातम्या –
‘डब्ल्यूटीसी फायनल गमावली म्हणून…’, माजी कर्णधाराकडून रोहित शर्माची पाठराखण
“करोडोंचे करार म्हणजे यश नव्हे”, दिग्गजाने बीसीसीआयचा केला पाणउतारा, आयपीएलबाबत म्हणाले…