विराट कोहली आणि भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा हे दोघेही नुकत्याच झालेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) खराब फॉर्ममध्ये दिसले. यामुळे तीव्र नाराज झालेल्या काही चाहत्यांची त्यांना संघातून काढावे अशी मागणीही होऊ लागली आहे. त्यातच रोहितच्या लहाणपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी कोहलीबाबत महत्वाचे विधान केले आहे.
“सुनील गावसकर, व्हिव्हियन रिचर्ड्स हे महान फलंदाज सुद्धा खराब फॉर्ममधून गेले आहेत. त्यांनी आपल्या कामगिरीत सुधारणा करत संघासाठी चांगले खेळले. तसा विराटही लवकरच चांगली फलंदाजी करेल,” असे लाड यांनी म्हटले आहे.
कोहलीने (Virat Kohli) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ७० शतके केली आहेत, तर ७१व्या शतकाची चाहते चातकासारखी वाट पाहत आहे. त्यातच त्याचा सध्याचा फॉर्म पाहता पुढील शतक तो कधी करेल, की होणारच नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचे शतक नोव्हेंबर २०१९मध्ये ठोकले आहे.
“विराट हा एक जगातील एक उत्तम फलंदाज आहे. त्याने सचिन तेंडुलकरचा १०० शतकांचा विक्रम तोडावा अशी माझी इच्छा आहे,” असेही लाड यांनी पुढे म्हटले आहे.
यावेळी लाड यांनी रोहितच्या (Rohit Sharma) कामगिरीचा देखील उल्लेख केला आहे. “रोहित हा जागतिक स्तरावरील फलंदाज आहे. त्याची सध्या फलंदाजी कमकुवत झाली आहे, पण तो लवकरच त्याच्यात सुधारणा करेल. तसेच, त्याला क्रिकेटमधून बाहेर पडून कुटुंबासोबत थोडा निवांत वेळ मिळणे आवश्यक आहे,” असे रोहितबाबत लाड यांनी म्हटले आहे.
या महिन्यात घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी रोहित आणि विराट यांना विश्रांती दिली आहे. यातील पहिला सामना ९ जूनला दिल्ली येथे खेळला जाणार आहे.
तसेच इंग्लंडमध्ये १ ते ५ जुलै दरम्यान होणाऱ्या एकमेव कसोटीसाठी रोहित संघाचे नेतृत्व करणार आहे, तर विराटचाही संघात समावेश आहे. ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलिया येथे होणाऱ्या आयसीसी टी२० विश्वचषकासाठी रोहित-विराटने लवकरच चांगली कामगिरी करावी अशी चाहत्यांची इच्छा आहे.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये करोडोंची बोली लागल्यानंतर खरंच तेवढे पैसे खेळाडूंच्या खात्यात जमा होतात का?
आयपीएल ट्रॉफी बनवायला चक्क ‘इतके’ कोटी आला होता खर्च, ३० कारागिरांनी मिळून बनवलाय चषक
IPL 2022मध्ये सापडलं भारताचं भविष्य; ‘ही’ आहे टीम इंडियाची सर्वोत्तम अनकॅप्ड प्लेइंग इलेव्हन