भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या ऐतिहासिक कसोटी मालिकेत भारतीय संघाने 2 -1 ने विजय मिळवला आहे. भारताच्या या यशात अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने महत्त्वाची भूमिका पार पाडली. पुजाराने ब्रिस्बेन येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात आपल्या शरीरावर अनेक जखमा घेत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा यशस्वीपणे सामना केला. पुजाराच्या या अविश्वसनीय खेळीबद्दल संपूर्ण क्रिकेट विश्वाकडून त्याचे कौतुक केले जात आहे.
पुजारासाठी मात्र ही खेळी फारच वेदनादायी ठरली. अनेकवेळा चेंडू त्याच्या शरीरावर आदळल्याने तो वेदनाग्रस्त जाणवत होता. मालिका संपल्यानंतर नुकतीच पुजाराची प्रतिक्रिया समोर येत असून, त्याने दुखापतीची तीव्रता स्पष्ट केली आहे.
मालिका संपल्यानंतर पुजारा ब्रिस्बेन येथील खेळीबद्दल म्हणाला, “ही एक अवघड खेळी होती. मला अशी एकही खेळी आठवत नाही ज्यात माझ्या शरीरावर इतके चेंडू आदळले होते. पण मी विकेट न गमावण्याचा निश्चय केला होता.”
पुजाराला बऱ्याच वेळा दुखापत झाल्याने अनेक समालोचक तो रिटायर्ड हर्ट होणार असे बोलत होते. पण पुजाराने तसे केले नाही. याबद्दल बोलताना पुजारा म्हणाला ,” नाही, अजिबात नाही. रिटायर होण्याचा पर्याय देखील नव्हता.मी स्वतःशीच बोलत होतो की आता बाद होणार नाही. हो बोटाला चेंडू लागल्याने मला वेदना होत होत्या, पण मी डॉक्टर नितीन पटेल यांना सांगितले की मला गोळ्यांची काहीही गरज नाही.पाचव्या दिवसाचा खेळ हा फारच महत्त्वाचा होता, व त्यामुळे मी फलंदाजी करणे सुरूच ठेवले.”
दरम्यान पुजाराच्या कामगिरीचा विचार केला असता, त्याने ब्रिस्बेन येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी शानदार अर्धशतक झळकावले. विशेष म्हणजे पुजाराने तब्बल 211 चेंडू खेळून काढत 7 चौकरांच्या मदतीने 56 धावांची खेळी केली. पुजराच्या या खेळीमुळेच शुभमन गिल व रिषभ पंत यांना आक्रमक खेळी करण्याची संधी मिळाली व भारतीय संघ इतिहास रचत सामना जिंकण्यात यशस्वी ठरला.
महत्त्वाच्या बातम्या –
अविश्वसनीय झेल…! बिग बॅश लीगमध्ये ‘या’ खेळाडूने पकडला भन्नाट झेल, पाहा व्हिडिओ
PAK vs SA : फिरकीच्या जाळ्यात फसला पाहुणा संघ, कराची कसोटीत पाकिस्तानचा दमदार विजय






