भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना अनिर्णीत राहिला. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी अप्रतिम खेळीचे प्रदर्शन केले, पण तरीदेखील ते विजय मिळवू शकले नाहीत. न्यूझीलंडचे तळातील खेळाडू रचिन रवींद्र आणि एजाज पटेल हे पाचव्या दिवशी शेवटपर्यंत खेळपट्टीवर कायम राहिले आणि सामना अनिर्णीत केला. या विजयानंतर रवींद्रने सहकारी एजाज पटेलसोबत सामना अनिर्णीत केल्याचा आनंद व्यक्त केला आहे.
न्यूझीलंडचा रचिन रवींद्र २२ वर्षांचा आहे आणि भारताविरुद्ध कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातून त्याने कसोटी पदार्पण केले आहे. पदार्पण सामन्यात रचिन रवींद्र गोलंदाजीत काही खास प्रदर्शन करू शकला नाही. त्याने सामन्यातील दोन्ही डावांमध्ये एकही विकेट घेतला नाही. पण शेवटच्या दिवशी एजाज पटेलसोबत मिळून न्यूझीलंडच्या हातातून निसटत चाललेला सामना अनिर्णीत केला.
न्यूझीलंडला विजय मिळवण्यासाठी भारताने २८४ धावांचे आव्हान दिले होते. रवींद्रने या सामन्याच्या अंतिम टप्प्यात ९१ चेंडूंचा सामना केला आणि १८ धावा केल्या. तसेच एजाज पटेलने २३ चेंडूंमध्ये २ धावा केल्या. या दोघांनी न्यूझीलंडचा शेवटचा विकेट गमावू दिला नाही.
एजाज पटेलने या सामन्यात एकूण ३ विकेट्स घेतले. एजाजने सामना अनिर्णीत केल्यानंतर न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या अधिकृत ट्वीटर खात्यासाठी रचिन रवींद्रची मुलाखत घेतली. मुलाखतील एजाजने प्रश्न विचारला की, “मला माझा पहिला कसोटी सामना लक्षात आहे. मी खूप चिंतेत होतो आणि चेंडू हातात आल्यावर माझे हात थरथर कापत होते. तुझा अनुभव कसा होता.”
यावर रवींद्र म्हणाला की, “मी देखील गोलंदाजीबाबत चिंतेत होतो. पहिल्या डावात आपले चार विकेट्स गेले होते आणि मी त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलो होतो. मला खूप अस्वस्थ वाटत होते, पण काही चेंडूंनंतर सगळं ठीक झालो.”
रचिन मुलाखतीत पुढे म्हणाला, “भारताच्याच सुप्रसिद्ध क्रिकेटप्रेमींसमोर खेळून चांगले वाटले. माझ्या कारकिर्दीवर माझ्या आई वडीलांचा खूप प्रभाव राहिला आहे. मला विश्वास आहे की, त्यांना अभिमान वाटेल.”
रचिनने पटेलचेही कौतुक केले. “भाई, आपण मिळून हे करून दाखवले. मला माझ्या शैली आणि माझ्या सरावावर विश्वास होता. प्रेक्षक खूप गोंधळ घालत होते, पण तू देखील संयम कायम ठेवला. आपण दोघांनी मिळून एकाग्रता सोडली नाही आणि हा क्षण आपण अधीच विसरू शकणार नाही,” असेही रचिन पुढे म्हणाला.
"We did it together bro" – Rachin Ravindra and @AjazP share a special moment after play at Green Park. #INDvNZ pic.twitter.com/n2968pHDsf
— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 29, 2021
दरम्यान, भारताविरुद्ध हा सामना न्यूझीलंड संघासाठी अनिर्णीत केलेले दोन्ही खेळाडू मुळचे भारतीय वंशाचे आहेत. एजाज पटेलचा जन्म मुंबईत झाला आहे आणि नंतर तो न्यूझीलंडमध्ये स्थाईक झाला. तर रचिन रवींद्रचे आई वडील भारतीय वंशाचे असल्याचे समजते. रचिनच्या आईवडिलांना क्रिकेटची आवड असून त्यांनी भारताचे दिग्गज राहुल द्रविड आणि रचिन तेंडुलकर यांच्या नावावरून त्याचे नाव ‘रचिन’ असे ठेवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“केएल राहुलने पंजाब किंग्ज संघ सोडला, तर ‘या’ खेळाडूला बनवा नवा संघनायक”
जहाँ जाऊँ, तुझे पाऊँ..! उतावळा शार्दुल साखरपुड्यात मितालीसोबत भलताच रोमँटिक, व्हिडिओ पाहाच