खेळात यशस्वी होण्यासाठी मेहनत, जिद्द व चिकाटी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक खेळाडू आपल्या आयुष्यात काहीतरी ध्येय ठेवून मैदानात उतरत असतो. ते स्वप्न साकार करण्यासाठी मेहनत घेतो. पण कधी कधी काही खेळाडू मनाशी जिद्द बाळगून असतात. ही गोष्ट पूर्ण होईल तेव्हाच ही गोष्ट करेल. अशीच एका खेळाडूंच्या जिद्दीची गोष्ट आहे.
आजकाल सोशल मीडिया रोजच्या जीवनातील भाग बनला आहे. बऱ्यापैकी खेळाडू सोशल मीडियावर सक्रिय आहेत. सोशल मीडियावर आपण आपल्या भावना व्यक्त करत असतो.
ती बोलली होती “गोल्ड मिळणार तेव्हाच व्हॉट्सअप डीपी बदलणार” खरंच तिने गोल्ड मिळवला आणि डीपी बदलला. ही गोष्ट आंतराष्ट्रीय कबड्डीपटू सोनाली शिंगटेची आहे.
नुकताच नेपाळ येथे पार पडलेल्या १३ व्या दक्षिण आशियाई स्पर्धेत भारतीय कबड्डी संघाने पुरुष व महिला दोन्ही गटात सुवर्णपदक पटकावले. भारतीय महिला संघात भारतीय रेल्वेकडून खेळणाऱ्या मराठमोळ्या सोनाली शिंगटेची निवड झाली होती. आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक मिळल्यानंतर तिने दोन वर्षांपूर्वी ठेवलेला आपला व्हॉट्सअप डीपी बदलला.
व्हॉट्सअप डीपी बदलला यात विशेष असे काही नाही पण दोन वर्षांपूर्वी आशियाई कबड्डी चॅम्पियनशीपसाठी भारतीय संघात निवड न झाल्यामुळे तिने एक प्रेरणादायी डीपी ठेवला होता. तेव्हा ती बोलली होती की आता मी माझा डीपी तेव्हाच बदलेल जेव्हा आंतराष्ट्रीय स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवेल.
त्यानंतर जवळपास दोन वर्षे यासाठी तिला वाट पहावी लागली. दोन वर्षे तिने एकच डीपी कायम ठेवला होता. “जिंकण्याची क्षमता इतकी वाढवा की आपल्याला पराभूत करण्यासाठी प्रयत्न नाही, तर कट रचायला हवेत” हे वाक्य असलेला डीपी गेले दोन वर्षे तिने ठेवला होता.
मागील वर्षी आशियाई स्पर्धेसाठी सोनालीची भारतीय संघात पहिल्यांदाच निवड झाली होती. पण मात्र तेव्हा भारताला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. पण तिने हार मानली नाही. त्यांनतर जवळपास सव्वा वर्षांनी पुन्हा एकदा भारतीय संघात सोनालीची निवड झाली. दक्षिण आशियाई स्पर्धेत कबड्डीत सुवर्णपदक पटाकवल्यानंतरच अखेर तिने आपला डीपी बदलला.
व्हॉट्सअप्प डीपी बदलला यात विशेष नव्हते पण मनाशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द खूपच कौतुकास्पद होती. एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी, अश्याप्रकारे जिद्द बाळगणारे खूप कमी खेळाडू असतात. स्वप्न साकार करण्यासाठी सोनालीने घेतलेली मेहनत, जिद्द व चिकाटी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
भव्य आंबेकर स्मृती कबड्डी स्पर्धेत शिवशक्ती, अमर हिंद मंडळाची आगेकूच https://t.co/IQWRI2MElJ#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi #Kabaddi #KhelKabaddi
— Maha Sports (@Maha_Sports) December 10, 2019
आज मुंबईत होणार भारत-विंडीज निर्णायक टी२० सामना, जाणून घ्या सर्वकाही…
वाचा????https://t.co/gYSIvgVPuO????#म #मराठी #INDvsWI #Cricket @Mazi_Marathi @MarathiRT— Maha Sports (@Maha_Sports) December 11, 2019






