दुबई | आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 13 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर अर्जुन पुरस्कार मिळाल्यानंतर प्रेरणा मिळालेला भारतीय वेगवान गोलंदाज इशांत शर्मा म्हणाला की, जेव्हा पर्यंत त्याचे शरीर त्याची साथ देईल तो पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे.
31 वर्षीय या खेळाडूने 2007 मध्ये कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि पुढच्याच वर्षी प्रथम टी -20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला.
इशांतने एका निवेदनात म्हटले आहे की, “मला अगदी लहान वयात क्रिकेटविषयीची आवड निर्माण झाली होती आणि तेव्हापासून मी दररोज माझे शंभर टक्के प्रयत्न करीत आहे. माझा खेळ सुधारण्याच्या दृष्टीने मी उचललेली सर्व पाऊले व लक्ष्य भारताचे नाव उंचावणे हे आहे.”
Extremely grateful and honoured to receive the #ArjunaAward! Congratulations to fellow awardees for the same! Thanks for constant support and love from all of you!🇮🇳🙏 pic.twitter.com/dLh5WnjnEo
— Ishant Sharma (@ImIshant) August 29, 2020
आपल्या अधिकृत ट्विटरवर शेअर केलेल्या निवेदनात तो म्हणाला की, “जोपर्यंत माझे शरीर परवानगी देते मी हे करतच राहीन आणि जर देवाचा आशीर्वाद मिळाला तर ते नंतरही सुरूच राहिल.”
भारतासाठी 97 कसोटी, 80 एकदिवसीय आणि 14 टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या इशांतची यावर्षी अर्जुन पुरस्कारासाठी निवड झालेल्या 27 खेळाडूंमध्ये समावेश आहे.
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) साठी युएईमध्ये असल्याने तो शनिवारी ऑनलाईन पुरस्कार सोहळ्यात सहभागी होऊ शकला नाही.