---Advertisement---

‘मी त्याला शुभेच्छा देणार नाही…’, वर्ल्डकपमधील शमीच्या धमाकेदार प्रदर्शनाबद्दल पत्नीचे धक्कादायक विधान

Hasin-Jahan-And-Mohammed-Shami
---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजी फळीचा हुकमी एक्का मोहम्मद शमी सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 4 सामन्यात तब्बल 16 विकेट्स घेतल्या आहेत. यापैकी दोन सामन्यात त्याने प्रत्येकी 5 विकेट्स घेण्याचा पराक्रमही गाजवला आहे. तसेच, तो स्पर्धेच्या इतिहासात भारतासाठी सर्वाधिक 45 विकेट्स घेणाराही गोलंदाज बनला आहे. शमीच्या या प्रदर्शनामुळे संपूर्ण देशाला त्याचा अभिमान आहे. मात्र, त्याच्या पत्नीचे मत वेगळे आहे. तिने लक्षवेधी प्रतिक्रिया दिली आहे.

मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहाँ (Mohammed Shami’s Wife Hasin Jahan) हिने शमीला शुभेच्छा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हसीन जहाँ (Hasin Jahan) सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत हसीनला स्पर्धेतील शमीच्या प्रदर्शनाविषयी प्रश्न विचारले. मागील काही दिवसांपूर्वी हसीन एका टीव्ही चॅनेलच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यादरम्यान होस्टने तिला सांगितले की, शमीने विश्वचषक 2023 स्पर्धेत 3 सामन्यात 14 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, जुने विक्रमही मोडले आहेत. एक चाहती म्हणून तुम्हाला त्याच्या प्रदर्शनाविषयी प्रतिक्रिया द्यायची आहे का?

या प्रश्नाचे उत्तर देताना ती म्हणाली, “मी एक क्रिकेट चाहती नाहीये आणि मी पाहतही नाही. त्यामुळे मला माहिती नाही की कुणी किती विकेट्स घेतल्या. जर तो (शमी) चांगली कामगिरी करत आहे आणि चांगले खेळला, तर संघात कायम राहील. चांगले कमावले, तर आमचे भविष्य सुरक्षित राहील. यापेक्षा चांगली बाब काय असेल ना.”

https://twitter.com/Vipintiwari952_/status/1721849162910531718?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1721849162910531718%7Ctwgr%5E81a3e1f0a67147f77b7f4a2b9607312049fadd87%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.sportskeeda.com%2Fcricket%2Fwife-hasin-jahan-gave-strange-reaction-on-his-husband-mohammad-shami-s-performance-in-world-cup-2023-watch-video

यानंतर होस्टने तिला विचारले की, तुम्ही भारतीय संघ आणि शमीला शुभेच्छा तर देऊच शकता. यावर हसीन म्हणाली की, “भारतीय संघाला शुभेच्छा देईल, पण शमीला देणार नाही.” अशात मोहम्मद शमी (Mohammed Shami) याच्या एक्स पत्नीचे हे विधान सर्वत्र चर्चेत आहे.

कशी सुरू झाली होती लव्ह स्टोरी?
खरं तर, 33 वर्षीय मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ (Mohammed Shami And Hasin Jahan) यांची लव्ह स्टोरी आयपीएल 2011दरम्यान सुरू झाली होती. त्यानंतर दोघांनी 2014मध्ये लग्न केले होते. मात्र, 4 वर्षांनंतर हसीनने शमीवर गंभीर आरोप लावत त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून हसीन तिच्या मुलीला घेऊन शमीपासून वेगळी राहत आहे. शमी दर महिन्याला तिला जवळपास 1 लाख 30 हजार रुपये देखभालीसाठी देतो. दोघांच्या घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयात आहे. (i will not give him good wishes hasin jahan refuses to praise mohammed shami excellent performance in cwc 2023)

हेही वाचा-
लय भारी! मॅक्सवेलची विस्फोटक खेळी पाहून अभिनेता रितेश देशमुखही बनला फॅन, म्हणाला, ‘हारलेली लढाई…’
ODI Rankings: 24 वर्षीय शुबमन बनला जगातील नंबर 1 फलंदाज, बाबरची बादशाहत संपुष्टात

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---