---Advertisement---

लय भारी! मॅक्सवेलची विस्फोटक खेळी पाहून अभिनेता रितेश देशमुखही बनला फॅन, म्हणाला, ‘हारलेली लढाई…’

Riteish-Deshmukh-And-Glenn-Maxwell
---Advertisement---

सर्वत्र आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेची धामधूम सुरू आहे. स्पर्धेत एकापेक्षा एक सामने पाहायला मिळत आहेत. तसेच, गोलंदाज आणि फलंदाजही आपल्या कामगिरीने विश्वविक्रम घडवताना दिसत आहेत. असाच एक फलंदाज आहे, ज्याने स्पर्धेच्या 39व्या सामन्यात मंगळवारी (दि. 07 नोव्हेंबर) आव्हानाचा पाठलाग करताना चक्क द्विशतक ठोकत इतिहास घडवला. तो फलंदाज इतर कुणी नसून ग्लेन मॅक्सवेल आहे. त्याने अफगाणिस्तानविरुद्ध नाबाद राहून द्विशतक ठोकण्याचा पराक्रम केला. त्याच्या खेळीवर जगभरातून प्रतिक्रियांचा पाऊस पडला. मात्र, यातील एका दिग्गज व्यक्तीच्या प्रतिक्रियेने सर्वांचे लक्ष वेधले. ती व्यक्ती इतर कुणी नसून मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवणारा प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आहे.

मॅक्सवेलची धमाल खेळी
या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 5 विकेट्स गमावत 291 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली होती. एकेवेळी ऑस्ट्रेलिया 7 बाद 95 धावांवर खेळत होता. मात्र, त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याने तडाखेबंद खेळी केली. मॅक्सवेलने सामन्यात 128 चेंडूंचा सामना करताना नाबाद 201 धावांची द्विशतकी (Glenn Maxwell 201) खेळी केली. त्याच्या खेळीत 10 षटकार आणि 21 चौकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे, यादरम्यान त्याला तीव्र वेदनाही होत होत्या. मात्र, त्याने मध्ये मध्ये ब्रेक घेत स्वत:ला सावरले आणि शेवटी संघाला 3 विकेट्सने विजय मिळवून दिला.

काय म्हणाला रितेश देशमुख?
मॅक्सवेलची ही खेळी पाहून प्रत्येक क्रिकेटप्रेमी त्याच्यावर फिदा झाला. यामध्ये मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख (Actor Riteish Deshmukh) याच्या नावाचाही समावेश आहे. रितेशने मॅक्सवेलची खेळी पाहून दोन ट्वीट केले. त्यातील पहिले ट्वीट हे मॅक्सवेलच्या शतकानंतर केले होते. त्याने पहिल्या ट्वीटमध्ये लिहिले की, “मॅक्सवेलने कमाल केली. काय खेळी होती. शानदार शतकाबद्दल अभिनंदन.”

यानंतर मॅक्सवेलने विक्रमी द्विशतक केल्यानंतर रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याने आणखी एक ट्वीट केले. यावेळी तो म्हणाला, “मॅक्सिमम सिटी – मॅक्सवेल जादू. यापेक्षा अविश्वसनीय खेळी मी कधीही पाहिली नाही. द्विशतक…हारलेली लढाई जिंकण्याची मॅक्सवेलची अतूट वचनबद्धता.”

मॅक्सवेलचा विक्रम
मॅक्सवेलने हे द्विशतक करताच, त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. वनडे क्रिकेट सामन्यात आव्हानाचा पाठलाग करताना मॅक्सवेलने सर्वोच्च धावसंख्या उभारण्याचा विक्रम केला आहे. त्याने आव्हानाचा पाठलाग करताना एका डावात 201 धावा करून फखर जमान याचा विक्रम मागे टाकला होता. फखरने 2021मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आव्हानाचा पाठलाग करताना 193 धावा केल्या होत्या. (Actor Riteish Deshmukh on Glenn Maxwell Fabulous Double Century Said this know here)

हेही वाचा-
ODI Rankings: 24 वर्षीय शुबमन बनला जगातील नंबर 1 फलंदाज, बाबरची बादशाहत संपुष्टात
ज्याने सोडला कॅच त्यालाच ठोकल्या 4 चेंडूत 22 धावा, पाहा नेमकं काय घडलं

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---