---Advertisement---

पायाला गोळे येऊनही मॅक्सवेलने ठोकली डबल सेंच्युरी, ऐतिहासिक विजयानंतर सांगितला आख्खा प्लॅन, म्हणाला…

Glenn-Maxwell
---Advertisement---

जिद्दीला पेटणे काय असते, हे मंगळवारी (दि. 07 नोव्हेंबर) विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 39व्या सामन्यात पाहायला मिळाले. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअममध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान संघ आमने-सामने होते. हा सामना ऑस्ट्रेलियाने 3 विकेट्सने जिंकला. मात्र, या विजयाचा खरा शिल्पकार ग्लेन मॅक्सवेल ठरला. मॅक्सवेलने पायाला गोळे असतानाही जिद्दीने एका जागी उभा राहून नुसता चौकार-षटकारांचा पाऊस पाडत ऐतिहासिक द्विशतकी खेळी केली. त्याच्या या अविस्मरणीय खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानच्या तोंडचा विजय पळवला. अशात या खास खेळीनंतर त्याने आपल्या योजनेचा खुलासा केला.

विशेष म्हणजे, या विजयासह ऑस्ट्रेलिया (Australia) संघाने विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सामना जिंकल्यानंतर द्विशतकवीर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. हा पुरस्कार मिळाल्यानंतर मॅक्सवेलने योजनेबद्दल सांगितले.

काय म्हणाला मॅक्सवेल?
अफगाणिस्तानला पराभवाचा धक्का दिल्यानंतर मॅक्सेवेलने आपल्या योजनेचा खुलासा करत म्हटले, तो आधीपासूनच मनाची तयारी करून आला होता की, त्याला उशीरपर्यंत क्रीजवर टिकून राहायचे आहे. मॅक्सवेल म्हणाला, “आज मी जेव्हा क्षेत्ररक्षण करत होतो, तेव्हा खूपच उकाडा होता, ज्यामुळे मी जास्त व्यायाम करू शकलो नाही आणि पायाची हालचाल व्हावी यामुळे मला वाटत होते की, आज फलंदाजी योजनेवर जास्त लक्ष केंद्रित करू शकेल. तसेच, जास्त वेळ क्रीजवर थांबावे. अफगाणिस्तानने चांगली गोलंदाजी केली. हे हैराण करणारे आहे. सुरुवातीच्या दोन सामन्यांनंतर लोकांनी आम्ही स्पर्धेतून बाहेर पडल्याचे मानले होते, पण आम्हाला एक संघ म्हणून स्वत:वर विश्वास होता.”

मॅक्सवेलचा तडाखा
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर अफगाणिस्तान संघाने इब्राहिम जादरान याच्या नाबाद 129 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर 291 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात खराब राहिली. 91 धावसंख्येवर ऑस्ट्रलिया संघाने 7 विकेट्स गमावल्या होत्या. मात्र, मॅक्सवेल याने टिच्चून फलंदाजी केली. त्याच्या पायाला गोळे आले असतानाही तो शेवटपर्यंत टिकून राहिला. त्याने या सामन्यात फक्त 128 चेंडूंचा सामना करताना विक्रमी 201 धावांची नाबाद द्विशतकी खेळी केली. त्याच्या या खेळीत 10 षटकार आणि 21 चौकारांचा समावेश होता. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ हा सामना 3 विकेट्सने जिंकण्यात यशस्वी झाला. (aus vs afg glenn maxwell reveals about his double hundred against afghanistan in CWC 2023)

हेही वाचा-
ठरलं! उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेशी भिडणार ऑस्ट्रेलिया, भारताविरुद्ध खेळण्यासाठी कुणाचा लागणार नंबर?

हा विजय मॅक्सवेलचा! डबल सेंच्युरी ठोकत पठ्ठ्यानं अफगाणिस्तानची उडवली धूळधाण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---