इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) जोरदार प्रदर्शन केल्यावर दीपक हुड्डाचे भारतीय संघात पदार्पण झाले. सध्या तो एशिया कप (Asia Cup) स्पर्धेच्या तयारीत व्यस्त आहे. त्याने यावर्षीच फेब्रुवारीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले असून तो आता संघाचा नियमित सदस्य बनला आहे. भारतीय संघाचे माजी क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर श्रीधर यांनी १९ वर्षाखालील भारतीय संघाची आठवण सांगितना हुड्डाबाबतचा एक मजेशीर किस्सा सांगितला आहे.
क्रिकेट डॉट कॉमशी बोलताना श्रीधर म्हणाले, “जेव्हा मी प्रशिक्षक होतो, तेव्हा मी दीपकला खूप मेहनत करताना पाहिले. मी त्याला ‘कोच किलर’ म्हणत होतो, कारण त्याला अभ्यास करणे खूप आवडत असे.” त्यावेळी दीपक हुड्डा (Deepak Hooda) श्रीधर यांना म्हणत असे, ‘चला सर एक पॉवर हिटिंग सेशन करूया.’ नंतर कळाले की हुड्डाने आयर्लंड विरुद्ध टी२० शतक केले.
“जेव्हा जेव्हा हुड्डा मला पॉवर हिटिंग सेशनबाबत विचारणा करे तेव्हा मी त्याला नकार देत असू, कारण हुड्डा नेहमीच चेंडू स्टेडियमच्या बाहेर मारत होता. मी त्याला म्हणत असे की तो पांढरा चेंडू महाग असून त्याला आपण गमावू शकत नाही यामुळेच मी त्याच्यासोबत सेशनसाठी जात नव्हतो,” असेही श्रीधर यांनी पुढे म्हटले आहे.
हुड्डा सतत चांगली कामगिरी करत आहे. त्याच्या या कामगिरीचे कौतुक करत श्रीधर यांनी त्याला भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघाचे नियमित सदस्य मानले आहे. तसेच हुड्डा हा आगामी टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.
हुड्डा कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी सदैव तयार असतो. त्याने आयर्लंडच्या दौऱ्यात सलामीला फलंदाजी केली आहे. तसेच त्याने त्याच दौऱ्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतक केले. त्याने आतापर्यंत ९ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांतील ७ डावात ५४.८०च्या सरासरीने २७४ धावा केल्या आहेत.
हुड्डाचा आगामी एशिया कपसाठी भारतीय संघाच्या १५ जणांमध्ये समावेश आहे. एशिया कप २०२२ची सुरूवात २७ ऑगस्टपासून होणार आहे. ही स्पर्धा युनायटेड अरब अमिराती (युएई) येथे खेळली जाणार आहे. तर या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना २८ ऑगस्टला पाकिस्तान विरुद्ध आहे. हा सामना दुबई येथे खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानी दिग्गजाने केली आपल्याच संघाची पोलखोल; म्हणाला, “आमचा संघ…”
भारताला भिडण्यासाठी पाकिस्तानी संघ युएईत दाखल, शेअर केलेत खास फोटो
काय गोलंदाजी केलीस भावा? सगळेच फलंदाज शून्यावर बाद, १५ चेंडूत पालटला सामना