आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला येत्या ९ एप्रिलपासून प्रारंभ होणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये भारताचा ‘टेस्ट स्पेशालिस्ट’ फलंदाज चेतेश्वर पुजारा दीर्घकाळानंतर पुन्हा एकदा खेळतांना दिसणार आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने त्याला यंदाच्या हंगामासाठी आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले आहे.
मात्र आता या हंगामापूर्वी चेतेश्वर पुजाराने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. यापूर्वीच्या काही हंगामापूर्वी आयपीएलचा भाग असणार्या गुजरात लायन्सच्या संघाकडून खेळण्याची आपली त्याकाळी इच्छा होती, असा खुलासा पुजाराने केला आहे. तसेच या संघात निवड न झाल्याने आपण त्यावेळी निराश झालो होतो, असेही पुजारा म्हणाला.
गुजरात लायन्सचा संघ २०१६ आणि २०१७ साली आयपीएलचा भाग होता. चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांना निलंबित केल्या गेले होते. त्याचमुळे गुजरात लायन्सच्या संघाला आयपीएल मध्ये संधी मिळाली. या संघाचे मूळ शहर राजकोट होते. जे चेतेश्वर पुजाराचे देखील होम ग्राऊंड होते.
याच कारणाने त्या संघात संधी मिळावी, अशी इच्छा पुजाराची होती. याबाबत एका क्रीडा संकेतस्थळाशी बोलतांना पुजारा म्हणाला, “ज्यावेळी माझी गुजरात लायन्सच्या संघात निवड झाली नव्हती तेव्हा मला वाईट वाटले होते. पण त्या गोष्टी माझ्या हातात नव्हत्या. मी त्या संघाचा भाग असतो, तर मला आनंद झाला असता. मात्र आता या गोष्टीला काळ उलटला असून मी देखील त्यापासून पुढे गेलो आहे.”
मात्र आता पुजारा तब्बल ७ वर्षांनंतर आयपीएल मध्ये पुनरागमन करत आहे. याबाबत देखील तो अतिशय उत्सुक आहे. त्याबद्दल बोलतांना तो म्हणाला, “आयपीएल खेळून मला बराच काळ लोटला आहे. मी किंग्ज इलेव्हन पंजाबचा याआधी भाग होतो. शेवटचा सामना मी २०१४ साली मुंबई इंडियन्सकडून खेळलो होतो. आयपीएल मध्ये पुनरागमन करणे माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. कारण ही जगातील सर्वोत्कृष्ट टी२० लीग आहे.”
आता आगामी हंगामात पुजारा चेन्नई कडून खेळतांना कशी कामगिरी करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.
महत्वाच्या बातम्या:
ब्रेकिंग : दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी या खेळाडूची नियुक्ती, फ्रँचायझीने केली घोषणा
पश्चिम बंगाल निवडणूक : माजी क्रिकेटपटू आणि भाजप उमेदवार अशोक दिंडावर हल्ला
असे कुठे असते होय! आव्हान माहित नसतानाच फलंदाजांनी केली दिड षटके फलंदाजी