---Advertisement---

‘बाबरला खरेदी करण्यासाठी मी सगळा पैसा खर्च केला असता…’, इंग्लिश गोलंदाजाची मोठी प्रतिक्रिया

On: शुक्रवार, मार्च 31, 2023 4:12 PM
Babar Azam
---Advertisement---

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याच्याविषयी इंग्लंडचा दिग्गज जेम्स अँडरसन याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच पार पडलेल्या द अंड्रेड लीगच्या लिलावात एकाही संघाने बाबर आझमला खरेदी केले नाही. याच पार्श्वभूमीवर अँडरसनने ही प्रतिक्रिया दिली. अँडरसनच्या मते त्याने बाबरला खरेदी करण्यासाठी संघाचा सर्व पैसा खर्च केला असता. पण फक्त एका कारणास्तव त्याला खरेदीदार मिळाला नाही.

जेम्स अँडरसन (James Anderson) याने म्हटल्याप्रमाणे बाबर आझम (Babar Azam) एक चांगला खेळाडू आहे आणि त्याला खरेदी करण्यासाठी आपले सर्व पैसे खर्च केले असते. आगामी द हंड्रेड लीग 1 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पुरुष आणि महिला दोन्ही लीगचा पहिला सामना ट्रेंट रॉकेट्स आणि साउदर्न ब्रेव संघांमध्ये खेळला जाईल. आगामी हंगाम सुरू होण्याआधीत पहिल्या ड्राफ्टचे आयोजिन केले गेले, ज्यामध्ये एकूण 64 खेलाडूंची निवड झाली. पहिल्यांदाच महिला द हंड्रेडसाठीही ड्राफ्ट केला गेला.

असे असले तरी, आगामी द हंड्रेड हंगामात काही मोठ्या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली नाही. पाकिस्तानचा कर्णदार बाबर आझम आणि यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिजवान यांनी एकाही संघाने खरेदी केले नाही. तसेच वेस्ट इंडीजचा दिग्गज अष्टपैलू कायरन पोलार्ड आणि फिरकीपटू ट्रेंट बोल्ड यांनाही खरेदीरार मिळाले नाहीत. बीबीसीच्या एका पॉडकास्टवर बोलताना जेम्स अँडरसन () याने बाबरला खरेदीदार न मिळाला कारण सांगितले.

अँडरसनच्या मते बाबर आझम द हंड्रेडसाठी पूर्णवेळ उपलब्ध होणार नसल्याने त्याला खरेदीदार मिळाला नसावा. “मी बाबर आझमला खरेदी करण्यासाठी दुप्पट पैसे खर्च करेल. आपले सर्व पैसे बाबर आझमवर खर्च करू शकतो. पण अडचण एवढीच आहे की, शक्यतो तो या हंगामासाठी उपलब्ध राहू शकणार नाही. त्यामुळेच त्याला निवडले गेले नाही,” असे जेम्स अँडरसन म्हणाला. दरम्यान, बाबर आजला या लीगमध्ये खरेदीदार मिळाला नासला, तरी शाहीन शाह आफ्रिदी आणि हॅरिस रैफ मात्र आगामी द हंड्रेड लीगमध्ये खेलताना दिसतील. (‘I would have spent all the money to buy Babar…’, James Anderson said)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल सुरू होण्याआधी अहमदाबादमध्ये पाऊस, पहिल्या सामन्यावर काय होणार परिणाम?
आयपीएलचा किताब न जिंकणारे 4 संघ, 2 नवीन कर्णधारासोबत उतरणार मैदानात, यावेळी फळफळणार का नशीब?

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---