भारतीय क्रिकेटमध्ये नेहमीच सध्याचा कर्णधार विराट कोहली आणि माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची तुलना होत आली आहे. सचिनने केलेले विक्रम विराट मोडत आहे. म्हणून या दोघांमधील सर्वोत्तम कोण हे ठरवणे कठीण आहे.
सचिन खेळत असलेला काळ वेगळा होता. तर विराट खेळत असलेला काळ वेगळा आहे. या दोघांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण यावर चर्चा होत असताना ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लॅंगर यांना मला दोघेही संघात हवे आहेत, असे मत मांडले आहे.
“मला दोघांनाही संघात घ्यायला आवडेल. दोघेही उत्कृष्ठ खेळाडू आहे. त्यातच मी सचिनला खेळताना बघितले आहे. खेळपट्टीवर शांतपणे खेळत सचिनने अनेक विक्रम केले”, असे लॅंगर म्हणाले.
“विराटही सचिन प्रमाणे खेळपट्टीवर शांतपणे चांगला खेळ करत आहे. त्याने क्रिकेटच्या सगळ्या प्रकारात अप्रतिम खेळ करत आहे”, असे लॅंगर यांनी कोहलीच्या खेळीचे कौतुक करताना म्हटले.
काल (15 जानेवारी) झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या वन-डे सामन्यात कोहलीने 104 धावांची खेळी करताना तेंडुलकर याचा परत एकदा विक्रम मोडला.
विराटचे हे 39वे वन-डे क्रिकेटचे शतक ठरले. त्याने हे शतक त्याच्या वनडेमधील 210 व्या डावात केले. त्यामुळे वनडेत सर्वात जलद 39 शतके करण्याचा विक्रमही विराटच्या नावावर झाला आहे. याआधी सचिनने 350 डावात 39 शतके केली होती. यापेक्षा तब्बल 140 डाव कमी खेळत विराटने हा टप्पा गाठला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–बोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी
–त्या यादीत सचिन, लक्ष्मण, मनीष पांडेसह आता विराटचेही नाव
–९ भारतीय कर्णधारांना जे जमले नाही किंग कोहलीने कांगारूच्या भूमीत करून दाखवले






