---Advertisement---

“भुवनेश्वर एक अनुभवी गोलंदाज, पण मला त्याच्याऐवजी शार्दुलला निवडेल”

On: रविवार, ऑक्टोबर 31, 2021 5:51 PM
Shardul Thakur
---Advertisement---

भारतीय संघाला टी२० विश्वचषकातील त्यांच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून दारुण पराभव मिळाला आहे. यानंतर आता रविवारी (३१ ऑक्टोबर) न्यूझीलंडविरुद्ध खेळला जाणारा दुसरा सामना संघासाठी खूपच महत्वाचा बनला आहे. विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात स्थान मिळवण्याच्या दृष्टीने हा सामना जिंकणे दोन्ही संघांसाठी गरजेचे असणार आहे. दुसरीकडे पाकिस्तानने सलग तीन विजय मिळवून त्यांच्या उपांत्य सामन्यातील स्थान जवळपास पक्के केले आहे. याच पार्श्वभूमीवर न्यूझीलंडविरुद्ध सामन्यापूर्वी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले जाण्याची शक्यता व्यक्ते केली जात आहे. माजी क्रिकटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये एक महत्वाचा बदल सुचवला आहे.

लक्ष्मणने या सामन्यासाठी भुवनेश्वर कुमारच्या जागी शार्दुल ठाकुरला संधी दिली गेली पाहिजे, असे सुचवले आहे. ते स्टार स्पोर्ट्सवर गेम प्लॅन या कार्यक्रमांना बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, “मी शार्दुल ठाकुरला निवडेल, कारण शार्दुल फलंदाजीमध्ये धावा करू शकतो आणि तो विकेट घेण्यामध्येही माहिर आहे. तो फलंदाजी फळीमधील देखील खोली वाढवतो. त्यामुळे मी निश्चित रूपाने भुवनेश्वर कुमारच्या जागी शार्दुलसोबत जाईल. तो एक अनुभवी गोलंदाज आहे, पण जर तुम्ही संतुलन आणि प्लेइंग इलेव्हनच्या संयोजनाविषयी विचार केला, तर मला शक्यतो भुवनेश्वरच्या जागी शार्दुलला पाहायला आवडेल.”

यावेळी संजय बांगरही उपस्थित होते. चक्रवर्तीचा आंतरराष्ट्रीय अनुभव थोडा कमी आहे आणि या सामन्यासाठी रविचंद्रन अश्विन योग्य पर्याय असेल, असे संजय यांनी सांगितले.

ते म्हणाले की, “वरुण चक्रवर्तीचे यूएईमधील प्रदर्शन खूप चांगले नव्हते. तो शारजाहमध्ये खूप प्रभावी होता, पण दुबईमध्ये नाही, जेथे हा सामना खेळला जाणार आहे. सामन्याच्या महत्वाच्या दृष्टीने वरुण चक्रवर्तीने खेळलेल्या सामन्यांची संख्या थोडी कमी आहे आणि त्याचा आंतरराष्ट्रीय अनुभवही थोडा कमी आहे. या मोठ्या सामन्यासाठी, तुम्ही निश्चित स्वरुपात स्वभाव आणि अनुभवी व्यक्तीला निवडाल. त्यामुळे माझ्या मते वरुण चक्रवर्तीच्या जागी रविचंद्रन अश्विनला संधी मिळू शकते.”

महत्त्वाच्या बातम्या – 

अफलातून क्षेत्ररक्षक आणि उपयुक्त फलंदाज असूनही दुर्लक्षित राहिलेला मुंबईकर खेळाडू : रामनाथ पारकर

जेव्हा चेतन शर्माने घेतली होती हॅट्रिक; तेही तीन क्लीन बोल्ड!

वाढदिवशी सोढी नडणार विराट सेनेला! नेहमीच केलीय जबरदस्त कामगिरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---