भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने आपल्याला क्रिकेट सोडून आॅलिंपिंक गोल्ड मेडल जिंकायला आवडलं असतं असं विधान केलं आहे.
क्रिकइंफो वेबसाईटवरील एका २५ प्रश्नांच्या (रॅपिड फायर) कार्यक्रमात त्याने एका प्रश्नाला उत्तर देताना हे विधान केले आहे.
तुला क्रिकेट सोडून कोणत्या खेळात मेडल किंवा ट्राॅफी जिंकायला आवडेल अशा प्रश्नावर राहुलने हे उत्तर दिले.
“मला कोणतही आॅलिंपिंक गोल्ड मेडल जिंकायला आवडेल. ते अगदी आॅलिंपिंक पहाण्यासाठी असेल तरी चालेल. आॅलिंपिंक हे एक मोठी गोष्ट आहे आणि ते जिंकयाला नक्की आवडेल. ” असे यावेळी द्रविड म्हणाला.
राहुल द्रविड भारताकडून १६४ कसोटी, ३४४ वनडे आणि १ टी२० सामना खेळला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–एमएस धोनी आणि धडक फेम इशान खट्टर झाले फुटबॉल सामन्यात सैराट
–बीसीसीआयचा हा पराक्रम युसूफ पठाणमुळे हुकला
–रोहीत शर्माच्या पत्नीचे युजवेंद्र चहलला सडेतोड उत्तर