राहुल द्रविड यांच्यानंतर टीम इंडियाचा हेड कोच बनेल, याबाबत सस्पेंस अजूनही कायम आहे. या पदासाठी माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याचं नाव आघाडीवर आहे. रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय आणि गंभीर यांच्यात यावर चर्चा झाली असून गंभीरचं नाव जवळपास फायनल झालं आहे. मात्र याची अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे.
आता हेड कोचच्या शर्यतीत नव्या नावाची एंट्री झाली आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली यानं भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी स्वत:चं नाव पुढे केलं आहे. सौरव गांगुली म्हणाला की, त्याला भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी घ्यायला आवडेल. गांगुली ‘एनआय’शी बोलताना म्हणाला की, मला भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनायला आवडेल.
याआधी गांगुलीनं या पदासाठी गौतम गंभीरच्या नावाचं समर्थन केलं होतं. “जर गंभीर मुख्य प्रशिक्षक बनायला तयार असेल, तर तो या पदासाठी चांगला उमेदवार आहे”, असं गांगुली म्हणाला होता. गौतम गंभीरनंही नुकतेच एका कार्यक्रमात भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली होती. “मी भारतीय संघाला प्रशिक्षण देणं पसंत करेल. आपल्या राष्ट्रीय संघाला प्रशिक्षण देणं, यापेक्षा दुसरा मोठा सन्मान नाही. तेव्हा तुम्ही 140 कोटींपेक्षा अधिक भारतीयांचं प्रतिनिधित्व करत असता”, असं गंभीर म्हणाला होता.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ टी20 विश्वचषकानंतर संपणार आहे. द्रविड पुन्हा या पदासाठी अर्ज दाखल करणार नाहीत. त्यामुळे आता बीसीसीआय नव्या मुख्य प्रशिक्षकाच्या शोधात आहे. या पदासाठी रिकी पॉन्टिंग, स्टिफन फ्लेमिंग, हरभजन सिंग, जस्टिन लँगर अशा दिग्गजांची नावंही समोर आली आहेत. मात्र अद्याप कोणतही अधिकृत घोषणा झालेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
वर्ल्डकप विजेत्या माजी क्रिकेटपटूचा लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय, तिसऱ्यांदा बनले खासदार
युरोपियन देशांविरुद्ध एकही टी20 सामना जिंकू शकले नाही! साहेबांच्या नावे लज्जास्पद विक्रम कायम
पावसामुळे वाहून जाईल भारत विरुद्ध आयर्लंड सामना? आज न्यूयॉर्कमधील हवामान कसं असेल? सर्वकाही जाणून घ्या