---Advertisement---

अखेर क्रिकेटचा परखड आवाज थांबणार! तब्बल साडेचार दशकांनंतर इयान चॅपेल यांची समालोचनातून निवृत्ती

---Advertisement---

माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व जगविख्यात क्रिकेट समालोचक इयान चॅपेल यांनी समालोचक म्हणून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तब्बल ४५ वर्षांच्या त्यांच्या समालोचन कारकिर्दीची अखेर होईल.

ऑस्ट्रेलियातील एका प्रमुख वृत्तसंस्थेशी बोलताना चॅपेल म्हणाले,

“जेव्हा मी समालोचन करण्यास सुरुवात केली, त्याच्या काही वर्ष अगोदर पासून मी याबाबत गांभीर्याने विचार करत होतो. मी आतापर्यंत हे काम अत्यंत इमानदारीने करण्याचा प्रयत्न केला. मी याचा आजवर आनंद घेतला. काही दिवसांपूर्वी मला झटका आला होता. त्यामुळे मनात कुठेतरी आले की आता थांबायला हवे. पुढच्या काळात गोष्टी आणखी कठीण होऊन जातील. त्यापूर्वीच हा निर्णय मी घेतला आहे.”

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी लवकरच समालोचन क्षेत्रात पदार्पण केलेले.

चॅपल यांनी ७५ कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करताना ४२.२ च्या सरासरीने ५३.४५ धावा केल्या. १९७१ मध्ये सुरू झालेल्या आणि १९७५ मध्ये संपलेल्या कारकिर्दीत त्यांनी १६ वनडे सामनेही खेळले आहेत. त्यांच्यासह त्यांचे बंधू ग्रेग चॅपेल व ट्रेव्हर चॅपेल यांनी देखील ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले होते.

इयान चॅपेल हे नेहमी आपल्या परखड बोलण्यासाठी ओळखले जायचे. आपल्याच ऑस्ट्रेलिया संघावर ही टीका करण्यास ते कदापी कचरले नाहीत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नव्याने आलेल्या खेळाडूंना ते नेहमी मार्गदर्शन करत. डेव्हिड लॉयड, रिची बेनो, हर्षा भोगले, सर जेफ्री बॉयकॉट यांच्यासारख्या दिग्गज क्रिकेट समालोचकांच्या यादीत त्यांचे नाव घेतले जाते.

महत्त्वाच्या बातम्या-

गप्टीलने रोहितचा बदला विंडीज विरुद्धच घेतला, वाचा कसं आहे कनेक्शन

मार्कस स्टॉयनिसने उडवली पाकिस्तानी गोलंदाजाची खिल्ली! व्हिडिओ तुफान व्हायरल

‘इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूला आपल्या मायदेशासाठी खेळायचं होतं क्रिकेट!’ माजी कर्णधाराने केलाय खुलासा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---