भारताचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विन मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. त्याला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत एकाही सामन्यात अंतिम ११ जणांच्या संघात संधी देण्यात आली नव्हती. त्याबद्दल अनेकांनी विविध मतं मांडली होती. असे असतानाच त्याची टी२० विश्वचषक २०२१ साठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. त्यामुळे तो तब्बल ४ वर्षांनी टी२० संघात खेळताना दिसेल. नुसकेच माजी क्रिकेटपटू इयान चॅपलचा यांनी अश्विनबद्दल आपले मत मांडले आहे.
ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार म्हणाले की या अनुभवी खेळाडूने सर्व परिस्थितींमध्ये स्वतःला एक चांगला गोलंदाज असल्याचे सिद्ध केले आहे आणि तो संघात स्थान मिळवण्यास पात्र आहे.
इयान चॅपेल यांनी आपल्या स्तंभात लिहिले आहे की, ‘आर अश्विन हा भारताचा सर्वोत्तम गोलंदाजांपैकी आहे. तो सर्व परिस्थितीत चांगली गोलंदाजी करू शकतो. याआधी त्याने ऑस्ट्रेलियात स्वतःला सिद्ध केले आहे, त्यामुळे भारताने त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्याचा मार्ग शोधला पाहिजे. भारतीय संघात खूप चांगली खोली आहे, ज्यामुळे तो मैदानावर एक मजबूत संघ दिसतो.
ते पुढे म्हणाले, ‘भारत खूप चांगला अष्टपैलू संघ आहे, यात शंका नाही. त्यांनी कोविडच्या प्रभावामध्ये देखील ऑस्ट्रेलिया आणि आता इंग्लंडमध्ये सलग दोन मालिका जिंकून हे सिद्ध केले आहे. याशिवाय ते घरच्या मैदानावर अजिंक्य असतात.’
इयान चॅपेल पुढे म्हणाले की, ‘भारतीय संघ व्यवस्थापनाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यांमध्ये डावखुरा फिरकीपटू आणि अष्टपैलू रवींद्र जडेजाला आर अश्विनपेक्षा जास्त पसंती दिली. रवींद्र जडेजा, आर अश्विन, हार्दिक पंड्या आणि रिषभ पंत यांची उपस्थिती खालच्या आणि मधल्या फळीला खूप मजबूत करते. ओव्हलवर मधल्या फळीत उजव्या आणि डाव्या हाताच्या फलंदाजांमध्ये योग्य संतुलन साधण्याच्या प्रयत्नात, त्यांना अनवधानाने एक उपाय सापडला तो म्हणजे पाचव्या क्रमांकावर रवींद्र जडेजाला खेळायला पाठवणे.’
‘जर जडेजा स्वत:ला या पदासाठी योग्य सिद्ध करतो, तर भारतीय संघाला फक्त एका अष्टपैलू वेगवान गोलंदाजाची गरज असेल. यासाठी आदर्श खेळाडू म्हणून हार्दिक पंड्या असेल, याशिवाय त्यांच्याकडे शार्दुल ठाकूरच्या रूपात दुसरा पर्याय उपलब्ध असेल. यानंतर तीन वेगवान गोलंदाज येतील. मग फलंदाजीला पाठिंबा देण्यासाठी विविधतेने भरलेला गोलंदाजीने हल्ला होईल. हा एक मजबूत आणि संतुलित संघ असेल भारतीय संघाला जिंकण्यासाठी मोठ्या धावसंख्येची आवश्यकता नसेल,’ असेही चॅपेल म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
प्लेसिसची भविष्यवाणी! ‘हे’ तिघे विश्वचषकात ठरणार दक्षिण आफ्रिकेसाठी ट्रम्पकार्ड
बुमराह फलंदाजांच्या विचारांशी खेळतो, म्हणून तो यशस्वी गोलंदाज, भारतीय दिग्गजाने उधळली स्तुतीसूमने
Video: इंग्लड दौरा गाजवल्यानंतर सीएसकेचे शार्दूल, जडेजा, पुजारा पोहचले दुबईत, आता राहणार क्वारंटाईन