श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 2 जून रोजी खेळला गेला. तसेच, या सामन्यात अफगाणिस्तानने श्रीलंकेचा 6 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने अफगाणिस्तानसमोर 269 धावांचे लक्ष्य ठेवले होते. जे अफगाणिस्तानने 6 गडी आणि 19 चेंडू राखून 46.5 षटकांत पूर्ण केले. याविजयामध्ये सर्वांत मोठा वाटा राहिला तो इब्राहिम झद्रानचा ज्याने संघासाठी चमकदार कामगिरी केली. तर चला जाणून घेऊ इब्राहिम झद्रान आहे तरी कोण?
अफगाणिस्तानच्या या 269 मोठ्या धावसंख्येचा नायक बनला 21 वर्षीय इब्राहिम झद्रान. इब्राहिमने 98 धावांची शानदार खेळी खेळली. विशेष म्हणजे त्याचे शतक अवघ्या 2 धावांनी हुकले. शेवटच्या दोन धावा त्याने पुर्ण केल्या असत्या तर त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील हे चौथे शतक ठरले असते. मात्र, इब्राहिमने (ibrahim zadran) जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या भारताच्या शुबमन गिलचा विक्रम मोडीत काढला आहे.
कोण आहे इब्राहिम झद्रान?
अफगाणिस्तानचा 21 वर्षीय स्फोटक फलंदाज इब्राहिमने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तर त्याने आतापर्यंत अफगाणिस्तानसाठी 4 कसोटी आणि 9 एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटीत, झद्रानने तीन अर्धशतकांसह 44.5 च्या सरासरीने 356 धावा केल्या. तर एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 66.4 च्या सरासरीने 531 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 3 शतके आणि 1 अर्धशतक देखील त्याच्या बॅटमधून खेळले गेले. झद्रानने बांगलादेशविरुद्धच्या कसोटी पदार्पणाच्या दुसऱ्या डावामध्ये अर्धशतक ठोकले. त्या खेळीच्या जोरावर झद्रान हा अर्धशतक झळकावणाऱ्या युवा खेळाडूंपैकी एक ठरला आहे. तो आगामी काळात अफगाणिस्तानसाठी महत्त्वाचा खेळाडू बनू शकतो असेही म्हटले जात आहे.
शुभमन गिलचे मोडीत काढले रेकॉर्ड
इब्राहिमने श्रीलंकेविरुद्ध 98 धावा करून शुबमन गिलचा (Shubman Gill) विक्रम मोडीत काढला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये (ODI cricket) केवळ 9 डावात 500 धावांचा टप्पा इब्राहिमने पार केला आहे. एकदिवसीय फॉर्मेटमध्ये सर्वात जलद 500 धावा करणारा तो संयुक्त दुसरा खेळाडू बनला. अशा परिस्थितीत त्याने भारताचा युवा आणि स्टार खेळाडू शुभमनचा विक्रमही मोडीत काढला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 500 धावा करण्यासाठी गिलने 10 डाव घेतले. तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 500 धावा करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या जानेमन मालनच्या नावावर असला तरी त्याने हा पराक्रम अवघ्या 7 डावात पुर्ण केला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
ब्रेकिंग! ‘या’ देशात सेक्सला खेळ म्हणून मान्यता, 16 प्रकारात रंगणार स्पर्धा; 45 मिनिटे चालणार सामना
‘…तिथे त्याची खूप पूजा केली जाते’, डेवॉन कॉनवेकडून धोनीवर कौतुकाचा पाऊस