टी२० विश्वचषक २०२१ त्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. विश्वचषचकातील अवघे तीन सामने खेळायचे बाकी आहेत, यामध्ये दोन उपांत्य आणि एका अंतिम सामन्याचा सामावेश आहे. सुपर १२ फेरीतील ग्रुप दोनमधून उपांत्य सामन्यात पोहोचलेल्या दोन संघांमध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा समावेश आहे, तर ग्रुप एकमधून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ उपांत्य सामन्यासाठी पात्र ठरले आहेत.
बुधवारी (१० नोव्हेंबर) इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला उपांत्य सामना खेळला जाणार असून त्यापूर्वी आयसीसीने या सामन्यांसाठी सामना अधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. या अधिकाऱ्यांमध्ये एका भारतीय पंचाचा समावेश आहे.
बुधवारी खेळल्या जाणाऱ्या पहिल्या उपांत्य सामन्यासाठी मरायस इरॅस्मस आणि कुमार धर्मसेना या दोघांना मैदानावरील पंच निवडले गेले आहे. तर भारताच्या नितीन मेनन यांच्यावरही या सामन्यात मोठी जबाबदारी असणार आहे. मेनन यांना या सामन्यात टीव्ही/ तिसऱ्या पंचाची जबाबदारी पार पाडायची आहे. तसेच पॉल रायफल यांना चौथ्या पंचाच्या रूपात निवडले गेले आहे. डेविड बून या सामन्यात रेफरीच्या भूमिका पार पाडतील.
गुरवारी (११ नोव्हेंबर) पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना खेळला जाईल. या सामन्यासाठी रिचर्ड केटेलबोरो आणि क्रिस गॅफने यांना मैदानावरील पंच निवडले गेले आहे. तिसऱ्या पंचाची भूमिका जोएल विल्सन यांच्यावर असेल. तसेच रिचर्ड इलिंगवर्थ यांच्यावर चौथ्या पंचाची जबाबदारी असेल. रेफरीची जबाबदारी जेफ क्रो यांच्यावर असेल.
दरम्यान, टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना १४ नोव्हेंबरला खेळाला जाईल, उपांत्य सामन्यात विजय मिळवणारे संघ अंतिम सामन्यात आमने-सामने असतील. अंतिम सामन्यासाठी आयसीसीने अद्याप सामना अधिकाऱ्यांची निवड केलेली नाही. उपांत्य सामने खेळले गेल्यानंतर आयसीसी या सामन्यासाठी अधिकाऱ्यांची निवड करेल.
बुधवारचा पहिला उपांत्य सामना अबू धाबी क्रिकेट स्टेडियमवर रात्री ७.३० वाजता खेळला जाणार आहे. तसेच गुरुवारचा दुसरा उपांत्य सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रात्री ७.३० वाजता खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
हार्दिकचा परतीचा मार्ग झाला खडतर! भारतीय संघात पुनरागमन करण्याआधी कराव्या लागणार ‘या’ गोष्टी
‘एका सामन्याच्या आधारावर राहुल चाहरला कसं वगळलं?’, माजी क्रिकेटरने उपस्थित केला प्रश्न