आयसीसीने मंगळवारी (दिनांक 27 जून) एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2023 चे वेळापत्रक जाहीर केले. तब्बल 46 दिवस चालणाऱ्या क्रिकेटच्या महाकुंभाची सुरुवात स्पर्धेचा यजमान भारत संघ आणि गतवेळचा चॅम्पियन संघ इंग्लंड यांच्यातील सामन्याने दिनांक 5 ऑक्टोबर रोजी होईल. अहमदाबादेतील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या सामन्यातून भारतीय संघ क्रिकेटच्या या महाकुंभात उडी घेत वर्ल्डकप जिंकण्यासाठी आपले पहिले पाऊल टाकेल.
भारतीय संघ हा यावेळी विश्वचषक स्पर्धेचा विजेता होण्यासाठी प्रमुख दावेदार संघ मानला जात आहे. मात्र असे असले तरीही अनेक तगड्या संघांचे आव्हान भारता समोर असणार आहे. भारतीय संघ वर्ल्डकपमध्ये कोणत्या संघासोबत, कधी कोणत्या दिवशी आणि कुठे भिडणार हे संपूर्ण वेळापत्रक आपण पाहूयात… ( ICC announce schedule for ODI World Cup 2023 )
भारतीय संघाचे वनडे वर्ल्डकप 2023 साठीचे संपूर्ण वेळापत्रक : Indian team schedule for World Cup 2023
भारत वि. ऑस्ट्रेलिया, 8 ऑक्टोबर, ठिकाण – चेन्नई ( IND vs AUS, Oct 8, Chennai )
भारत वि. अफगाणिस्तान, 11 ऑक्टोबर, ठिकाण – दिल्ली ( IND vs AFG, Oct 11, Delhi )
भारत वि. पाकिस्तान, 15 ऑक्टोबर, ठिकाण – अहमदाबाद ( IND vs PAK, Oct 15, Ahmedabad )
भारत वि. बांगलादेश, 19 ऑक्टोबर, ठिकाण- पुणे ( IND vs BAN, Oct 19, Pune )
भारत वि. न्यूझीलंड, 22 ऑक्टोबर, ठिकाण – धर्मशाला (IND vs NZ, Oct 22, Dharamsala )
भारत वि. इंग्लंड, 29 ऑक्टोबर, ठिकाण – लखनऊ ( IND vs ENG, Oct 29, Lucknow )
भारत वि. क्वालिफायर संघ, 2 नोव्हेंबर, ठिकाण – मुंबई ( IND vs Qualifier, Nov 2, Mumbai )
भारत वि. दक्षिण आफ्रिका, 5 नोव्हेंबर, ठिकाण – कोलकाता ( IND vs SA, Nov 5, Kolkata )
भारत वि. क्वालिफायर संघ, 11 नोव्हेंबर, ठिकाण – बंगळुरु ( IND vs Qualifier, Nov 11, Bengaluru )
अधिक वाचा –
– एकच नंबर..! आपल्या पुण्यात होणार वर्ल्डकपचे 5 सामने, जाणून घ्या गहुंजेवर होणाऱ्या सामन्यांचे वेळापत्रक
– BREAKING: वर्ल्डकपचे काउंटडाऊन सुरू! वेळापत्रक झाले जाहीर, अहमदाबादमध्ये होणार उद्घाटनाचा सामना